‘चक दे इंडिया’ फेम अभिनेते रमाकांत दायमा यांचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेते रमाकांत दायमा यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. दायमा यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. रमाकांत यांच्या सह-अभिनेत्री आणि जवळच्या मैत्रिण शुभांगी लाटकर यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. शुभांगी यांनी दयामा यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे.

आज आम्ही एक अद्भुत व्यक्ती गमावली आहे. माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत. रमाकांत दायमा केवळ एक मित्र किंवा कौटुंबिक मित्र नव्हते, तर एक अशी व्यक्ती होते ज्यांचे मी खूप कौतुक आणि आदर करत होते, असे शुभांगी लाटकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच रमाकांतसोबत अनेक योजना आखल्या होत्या, पण त्या अपूर्ण राहिल्या, असे शुभांगी यांनी पुढे नमूद केले.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, दायमा यांनी दशकांहून अधिक काळ आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. दायमा यांनी दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले. तसेच दायमा यांनी शाहरुख खानच्या ‘चक दे ​​इंडिया’ आणि अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

रमाकांत यांनी मराठी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 1994 मध्ये प्रदर्शित झालेला “फोटोग्राफर केरकर” हा त्याचा पहिला चित्रपट होता. ‘गांधी माय फादर’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘ब्रदर्स’, ‘बँक चोर’ अशा चित्रपटांत त्यांनी दमदार अभिनय केला. त्यानंतर 2015 मध्ये, त्यांनी “सर्व्हिस वाली बहू” या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 2007 मध्ये, त्यांनी शाहरुख खानच्या “चक दे​इंडिया” मध्ये एका आयएचएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या “पा” मध्ये त्यांनी काम केले आहे. २०१० मध्ये, ते सेंटर फ्रूटच्या एका जाहिरातीत दिसले होते. हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम 1992’ मध्ये त्यांनी शांतीलाल मेहता यांची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेब सिरीजमध्ये दायमा यांनी न्यायाधीशाच्या भूमिका निभावली होती.

Comments are closed.