कोणीही एकत्रित येऊद्या, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil : आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही स्वबळावर लढलो तरी 165 जणांना तिकीट मिळतील. पण महायुती म्हणून निवडणूक लढले पाहिजे असे पाटील म्हणाले. 28 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. 2 महापालिकांच्या निवडणुका होणार नाहीत असे पाटील म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास त्यांना स्वतंत्र आहे. बाकी कोणीही एकत्रित येऊद्या, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा असल्याचे पाटील म्हणाले.
लोकशाहीत सुंदरता एवढी आहे कोणीही काहीही म्हणू शकते
लोकशाहीत सुंदरता एवढी आहे कोणीही काहीही म्हणू शकते असे पाटील म्हणाले. महायुती म्हणून गल्लथ होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणे त्यांना स्वतंत्र आहे. बाकी कोणीही एकत्रित येऊ, पण आमचा प्रयत्न आहे महायुती म्हणून लढायच असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीत फाटलं, पण आता भाजप सेना मनोमिलन
नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीतील झालेले मतभेद आणि मनभेद दूर सारण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसतो आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार निवड, पदाधिकारी गटबाजी, आणि संघटनात्मक स्पर्धा यामुळे दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला होता. मात्र, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता हे मतभेद सोडवण्याची राजकीय गरज दोन्ही पक्षांनाही भासू लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावल्यानंतर त्याची धग अगदी कल्याण-डोंबिवली महापालिकेत येऊन पोहोचली होती. अशात, घरापर्यंत ही धग पोहोचल्याने शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एकनाथ शिंदे थेट गृहमंत्री अमित शाहांच्या दारी पोहोचले आणि त्यांच्याकडून यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले गेले.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत संघर्ष संपवावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अशात, हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. याबैठकीत दोन्ही पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर, लगेच भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिल्ली गाठत अमित शाहांसोबत चर्चा केली आणि दुसऱ्याच दिवशी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत जवळपास सर्व महापालिका एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
नगरपालिका निवडणुकीत फाटलं, महापालिकेला कसं जुळलं? शिवसेना-भाजपच्या मनोमिलनाची ‘इनसाईड स्टोरी’
आणखी वाचा
Comments are closed.