राष्ट्रवादी शरद पवारांचा, तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष…; चंद्रकांतदादांच वक्तव्य, म्हणाले..
Chandrakant Patil : सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव येथे बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ‘राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा (Sharad Pawar), तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष,’ असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष कोणाचा हा वाद सुरू असतानाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय. त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो कोणा एका व्यक्तीच्या मालकीचा नाही. तो अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, विशेषतः भाजपच्या मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
Chandrakant Patil on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर कॉलेजमध्ये असल्यापासून माझे प्रेम, पण…
राज ठाकरे आता त्या ग्रुपमध्ये जोडले गेले आहेत. राज ठाकरे यांच्यावर कॉलेजमध्ये असल्यापासून माझे प्रेम आहे. पण आज ते या ग्रुपमध्ये गेले आहेत. मी हल्ली कोणावरील निगेटिव्ह बोलत नाही. पण जो ग्रुप आहे पवार साहेब, उद्धव ठाकरे, काँग्रेसमधील इतर नेते त्यांना लोकसभेला ईव्हीएम मध्ये घोटाळा वाटत नाही, पण त्यांना विधानसभेला घोटाळा वाटतो. सतत आम्ही 41 जागा मिळवणारे लोकसभेला 17 जागावर कसे आलो. त्याचा प्रश्न आम्हाला देखील होता, पण त्यावर आम्ही विश्वास ठेवला. पण आता ते सिस्टीमवर आघात करत आहेत, ते अराजकतेवर जाईलपण ते सर्वांनाच भस्मसात करून टाकेल. विरोधकांचा मोर्चामध्ये मनामध्ये एक आणि ओठावर एक, असे आहे. मनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीवर राग असेल तर तो राग सदा सर्वदा व्यक्त करा. केजरीवाला हरले की म्हणायचे ईव्हीएममध्ये दोष. त्यामुळे मोर्चा सर्वसाधारण दृष्टीने राजकीय स्टंट आहे असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.