घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल

चंद्रपूर : जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात (Lake) बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी तलावात दुपारच्या दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच, तलाव पात्रात बुडालेल्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, कालच होळीच्या सेलिब्रेशनंतर बदलापूर येथील उल्हास नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता घोडझरी येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली आहे.

तलाव पात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे असून हे पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाची यंत्रणाही कार्यरत झाली असून घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा

खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल

अधिक पाहा..

Comments are closed.