भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी काय सांगितलं?
चंद्रपूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसने काही मोजक्या महापालिकांमध्ये सर्वाधिक सदस्य संख्या जिंकून आणल्या, त्यापैकी लातूर आणि चंद्रपूर (Chandrapur) ह्या दोन महापालिका. मात्र, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटांमुळे पक्षाची चांगलीच वाताहात झाल्याचं दिसून आलं. अखेर दिल्लीश्वरांच्या मध्यस्थीने सत्तास्थापनेचा मुहूर्त लागला. तरीही, ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसचा सगळा खेळ बिघडवला. त्यामुळे, चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असतानाही काँग्रेसला मॅजिक फिगर गाठता आला नाही, काँग्रेसला (Congress) महापौरपदावर आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. आता, या पराभवाची आणि भाजपच्या (BJP) विजयाची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी भाजप आणि शिवसेना उबाठा यांची काल चंद्रपूर महानगरपालिकेत युती झाली. विशेष म्हणजे शिवसेनेची शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत बोलणी सुरू होती. मात्र, अचानक बोलनी फिस्कटल्याने शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे हे वडेट्टीवार यांच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांना संपर्क केला. मात्र, भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा आणि करारनामा करण्यासाठी अतिशय कमी वेळ होता. त्यामुळे कारमध्येच युतीची अंतिम चर्चा करण्यात आली आणि त्याच कारमध्ये कशाप्रकारे सत्तेचे समीकरण बसवण्यात येईल याचा करारनामा देखील करण्यात आला आणि कारमध्येच भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी सही देखील केली. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी काल घडलेल्या अत्यंत वेगवान आणि नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये कार मधील करारनाम्याची ही ईनस्टाईड स्टोरी समोर आली आहे.
चंद्रपूरच्या महापौर निवडणुकीत किंगमेकर व्हावे म्हणून माझी भूमीका महत्वाची नाही, तर चंद्रपूरच्या जनतेच्या विजय व्हावा यासाठी मी काम करत होतो. जे सर्व काँग्रेस विरोधात होते त्या सर्वांना आम्ही एकत्र केले. सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बोलणं सुरु होते. काँग्रेसचे पण काही नगरसेवक आमच्या संपर्कात होते, आमच्यामुळे त्यांचं नगरसेवकपद अडचणीत येईल याची खबरदारी घेत होतो. मात्र अटीतटीच्या परिस्थितीत ते काँग्रेस नगरसेवक आम्हाला मदत करायला तयार होते, असा गौप्यस्पोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला. उबाठासोबत आमची चर्चा सतत सुरु होती. मात्र, अंतिम निर्णय शेवटच्या तासात ठरले. एक वर्षाऐवजी उबाठाला सव्वा वर्षांसाठी महापौर द्या मात्र पहिला महापौर भाजपचाच झाला पाहिजे ही भूमिका देवेंद्र फडणवीसांची होती, अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली.
हर्षवर्धन सपकाळांवर टीका
दरम्यानन, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्या घराचे मूल्यमापन एक हजार कोटीत केले, मी त्यांना 25 टक्क्यात घर द्यायला तयार आहे. अन्यथा त्यांनी आपला बाप बदलावा, असे आव्हानच हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.