सावकारी तगाद्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकायला लावली; वडिलांनी सांगितली लेकाची हृदयद्रावक व्यथा
चंद्रपूरच्या शेतकऱ्याने विकली किडनी : सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथुर येथील शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी त्यांचा मुलगा सावकारी पाशात कसा फसत गेला आणि अखेर त्याला आपली किडनी का विकावी लागली, याची विस्तृत हृदयद्रव पदार्थ व्यथा एबीपी माझाच्या कॅमेरासमोर मांडली आहे. कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशन कुडे सावकाराकडून घेतलेले अवघे एक लाख रुपयांचे कर्ज फेडू शकले नाही. मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात अडकवत राहिले. व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे. (कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूरच्या शेतकऱ्याने विकली किडनी)
Farmer Sold kidney : सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल, किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास स्वतंत्र चौकशी
चंद्रपूर जिल्ह्यात एका सावकाराने (Moneylender) आपले कर्जाचे पैसे वसूल (Loan repayment) करण्यासाठी शेतकऱ्याला अक्षरश: स्वत:ला विकायला लावल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालीहे. शेतकऱ्यांची (Farmers) होरपळ किती विदारक असू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण चंद्रपूरआवाज समोर आलं आणि साऱ्यांनाच या घटनेनं धक्काf आणि बसला. दरम्यानअवैध सावकारीच्या तगाद्यामुळे किडनी विकल्या प्रकरणी आता सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन कुडे (34) याला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळण्यात आल्याचं देखील पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
त्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. यातील सहा आरोपींपैकी सध्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर फिर्यादी रोशन कुडे याची सध्या वैद्यकीय तपासणी केली जात असून किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास या प्रकरणी देखील स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमकाni दिलीय.
चंद्रशेखर बावनकुळे : हा प्रकार गंभीर माहिती घेऊन यावर कडक कार्यवाही करू
कर्जाच्या परताव्यासाठी सावकार आणि किडनी विकायला लावली हा गंभीर प्रकार आहे. असा प्रकार झाला असेल तर त्यावर कडक कारवाई करू , अशी अभिप्राय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणार दिलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारणे किडनी विकायला लावल्याचा दावा रोशन खुडे या शेतकऱ्याने केला होता. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारची तातडीने माहिती घेऊ आणि यावर कडक कार्यवाही करू, हा प्रकार गंभीर आहे. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.