चंद्रपुरात काँग्रेसला धक्का! माजी आमदार अविनाश वारजूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

चंद्रपूर वार्ता: चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजुरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं राजीनामा पत्रात दोन्ही नेत्यांनी केलं आहे.

वारजूरक बंधूंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. चिमूर मतदार संघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट आगामी काळात या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यातच आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने वारजूरकर बंधू भाजपच्या तंबूत दाखल होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बंटी भांगडिया यांनी सतीश वारजूरकर यांना पराभूत केले होते.

आणखी वाचा

Comments are closed.