स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्याचा कारनामा; आधी फार्च्यूनरनं बॅरिकेट तोडलं,

चंद्रपूर वार्ता: वरोरा शहरात स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान आणि PM लिहून फिरणाऱ्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप समोर आलाय. महादेव आसेकर यांनी फार्च्यूनर कारने पोलिसांची नाकाबंदी तोडली. यानंतर पोलीस आणि नागरिकांनी चार किलोमीटरपर्यंत त्यांच्या मागे धाव घेतली असता आसेकर गाडी सोडून पळून गेले. सध्या आसेकर हे बेपत्ता आहेत.

Chandrapur News : नेमकं काय घडलं?

शनिवारी संध्याकाळी वरोरा शहरातील रत्नमाला चौकाजवळ पोलिसांनी नाकाबंदी लावली असता, आसेकर यांनी ती तोडून कार पुढे नेली. पोलिस आणि नागरिकांनी चार किलोमीटरच्या अंतरावर गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आसेकर गाडी सोडून पळून गेले. सध्या ते बेपत्ता आहेत. स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान असं लिहून फिरणाऱ्या आसेकर यांच्याकडे आतापर्यंत गंमत म्हणून पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं. मात्र, आता बॅरिकेट तोडल्याच्या प्रकरणामुळे आसेकर कायद्याच्या कचाट्यात फसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chandrapur News : आसेकरांच्या अर्जात विचित्र मागण्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसेकर यांनी वरोरा पोलीस आयुक्तांना अर्ज सादर केला होता. त्यात त्यांनी स्वतःला पंतप्रधान घोषित केले असल्याचा दावा करत पिस्टलसह अंगरक्षण आणि पंतप्रधानांना मिळणारे प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली होती. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि वर्षा तंदूलकर यांना पोलिस निरीक्षक (ठाणेदार) पदावर नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणामुळे महादेव आसेकर यांची राज्यभरात चर्चा रंगली आहे.

Chandrapur News : कोण आहे आसेकर?

महादेव आसेकर यांना शेतीतून पाच कोटी मिळाल्याचे समजते. यानंतर त्यांनी वरोरा येथे आलिशान घर खरेदी केले. तसेच फार्च्यूनर कार देखील घेतली. पूर्वी ते मी कॅबिनेट दर्जाचा माणूस असल्याचे सांगत होते. नंतर काही दिवस कारवर ‘व्हीआयपी पर्सन’ असे लिहिले होते. आता तर चक्क स्वतःला स्वयंघोषित पंतप्रधान म्हणून ते मिरवत आहे. वरोरा येथे ते खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानाच्या परिसरात राहत असल्याची माहिती समोर येत आहे. आसेकर हे प्रतिभा धानोरकर यांच्या घरासमोरून कार रेस करून पुढे नेतात, असे देखील समजते.

Chandrapur News : आसेकर कायद्याच्या कचाट्यात फसण्याची शक्यता

आसेकरांच्या या विलक्षण वर्तनामुळे वरोरात त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु बॅरिकेट तोडल्यामुळे पोलिसांकडून आता कडक कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे. स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान असं लिहून फिरणाऱ्या आसेकर यांच्यावर बॅरिकेट तोडल्याच्या प्रकरणामुळे कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Crime News: 12 वर्षांचा संसार; सोशल मीडियावर झालं दुसऱ्यासोबत प्रेम; इग्नोर केल्यानं प्रियकरानं घरी येऊन तिच्यावर झाडली गोळी, जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट

आणखी वाचा

Comments are closed.