Chandrapur news – जोरदार वादळामुळे शेड कोसळून तरुणाचा मृत्यू, मूल तालुक्यातील घटना
बांधकामाच्या विटा तयार करण्यासाठी शेतात उभारलेला शेड वादळात अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. डोनुजी शेणमारे असे तरुणाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील राजोली येथे शेतशिवारात ही घटना घडली.
मयत डोनुजी शेणमारे यांचे रेल्वे स्थानकाजवळ शेत आहे. या शेतात 1 महिन्यांपूर्वी बांधकामाच्या विटा तयार करण्यासाठी शेड उभारण्यात आले होते. साळच्या सुमारास मजूर येऊन विटा बनवून निघून गेले. त्यानंतर अचानक वादळ सुटले. जोरदार वाऱ्यामुळे शेड कोसळले आणि थेट तरुणाच्या अंगावर कोसळले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
Comments are closed.