चंद्रपूर हादरले! भररस्त्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर घडली. रंजीत राजवंशी (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी अमन कुर्वे (२९) यास शहर पोलिसांनी अटक केली. मृतकाच्या डोक्यात दगडाने 6-7 वेळा प्रहार केला. हत्येची ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रंजीत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांनी आरोपी अमन कुर्वे याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे करत आहे.

Comments are closed.