मायावी कॉंग्रेस भुईसपाट करायचंय, काँग्रेसकडून मोदींच्या विकासाला कीड लावण्याचं काम : बावनकुळे
चंद्रशेखर बावंकुले: 2047 मध्ये भारताला जगाची गरज पडणार नाही तर जगाला भारताची गरज पडणार असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. कंसरुपी मायावी कॉंग्रेस पार्टीला वरुड मोर्शीत भुईसपाट करायचं असल्याचे बावनकुळे म्हणाले. आजचा पक्ष प्रवेश अमरावती जिल्ह्यातील काँगेसला धक्का देणारा आहे. उत्तर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक नेत्यांनी काँगेस सोडल्याचे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला.
वरुड – मोर्शी मतदार संघात हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मोदींच्या विकासाला कीड लावण्यासाठी काँगेस काम करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. वरुड-मोर्शी मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे महसूल मंत्री तथा अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यावेळी बावनकुळे बोलत होते.
भाजपचा माजी पदाधिकारी असला तरी त्याला काम दिलं जातं
विक्रम ठाकरे हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. आज अखेर विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळं काँग्रेसला विदर्भात पुन्हा मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशावेळी भाषण करताना अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेससारखं काम भाजपामध्ये नाही, भाजपचा माजी पदाधिकारी असला तरी त्याला काम दिलं जातं. सन्मान देखील दिला जातो असे अनिल बोंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याआधी आरशात पाहा, 100 कोटी वसुली प्रकरण जनता विसरलेली नाही; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
आणखी वाचा
Comments are closed.