संजय शिरसाट म्हणाले 2100 रुपये देता येणार नाहीत, बावनकुळे म्हणाले दिलेलं आश्वासन पूर्ण करणारचं
चंद्रशेखर बावंकुले: लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन महायुतीतील नेते विविध वक्तव्य करत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी लाडक्या बहिणांनी 2100 रुपये देता येणार नाहीत असं वक्तव्य केलं होतं. यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते काय बोलले हे ऐकलं नाही. त्यांचा अभ्यास चांगला आहे ते विधानसभेत पण बोलतात. महायुती म्हणून आम्ही एकत्र बसू. पण निवडणुकीत आम्ही जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणारच असल्याचे बावनकुळे म्हणाले. योजनांमुळे ताण येतो आहे हे खर आहे पण उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही बावनकुळे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना (Ladki bahin yojana) 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र, राज्यात महायुती (Mahayuti) सरकार येऊन 6 महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच, सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले. तर, आता मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटलं आहे. राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. त्यातच, आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
चौंडीला कैबिनेट बैठक, सगळे विषय निघणार : शिरसाट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या महाबळेश्वर महोत्सवास उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यासंदर्भात शिरसाट यांनी भूमिका मांडली. एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री न जाण असं अनेकवेळा होतं असतं. अनेकवेळ कार्यक्रमाला वेळा दिल्या जातात, मात्र काहीवेळा जाता येत नाही. अजित पवार माझ्या मतदारसंघात आले मात्र मला माहितीच नाही. मला सांगणं अपेक्षित होतं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. तसेच, उद्या चौंडीला कैबिनेट बैठक होतं आहे या बैठकीमधे सगळे विषय निघणार आहेत असे शिरसाट म्हणाले होते.
https://www.youtube.com/watch?v=CBY-cummbmi
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल : संजय शिरसाट
अधिक पाहा..
Comments are closed.