गाणं म्हणणाऱ्या तहसिलदारांचे तात्काळ निलंबन; लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई कधी?
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापूर येथे बदली झालेल्या तहसीलदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत याराना चित्रपटातील गाणं गायलं होतं. विशेष म्हणजे यावेळी समोर त्यांच्याच विभागातील इतर कर्मचारीदेखील उपस्थित होते, त्यांना उद्देशून मैत्रीचा संदेश देणारे हे गाणं त्यांनी तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीवर बसून सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये थोरात हे विविध अंगविक्षेप व हातवारे करताना दिसत असून, त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही, असे म्हणत तहसीलदार महोदयांचे निलंबन करण्यात आल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. दरम्यान, तहसीलदारांवर तात्काळ कारवाई झाली, पण लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कधी असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
तहसीलदार महोदयांच्या खुर्चीवर बसून गाणं गाण्याच्या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतरही शासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.
लाथ मारणाऱ्या DYSP वर कारवाई कधी?
दरम्यान, जालन्यातली डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनीही वर्दीत असताना एका आंदोलक शेतकऱ्याला चक्क सिनेस्टाईल लाथ मारली होती. पायात बूट अन् अंगात वर्दी असतानाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची ही वागणूक नेटीझन्सनसह विरोधकांनाही खटकली होती. त्यामुळे, या महोदयांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. त्याच, अनुषंगाने महसूलमंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी माहिती घेऊन कारवाई करतो, असे उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र, केवळ गाणं म्हणणाऱ्या तहसीलदारांवर तातडीने कारवाई होते, पण लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालतंय का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
उमरी, जि. नांदेड येथून रेणापूर, जि. लातूर येथे बदली झालेले तहसीलदार श्री. प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये… pic.twitter.com/xjgkrbyn6e
– चंद्रशेखर बावंकुले (@cbawkule) 17 ऑगस्ट, 2025
हेही वाचा
दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, पोराला अटक
आणखी वाचा
Comments are closed.