20 पक्ष एकत्र आले तरी आम्ही घाबरलो नाही, आम्ही जिंकणारच, ठाकरे बंधुच्या युतीवर बावनकुळेंचा टोला

चंद्रशेखर बावनकुळे : लोकसभेला इंडिया आघाडीतील 20 पक्ष एकत्र आले होते. तेव्हाही आम्ही घाबरलो नाही. कितीही लोक येऊ द्या, आम्हीच जिंकणारचं असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना व्यक्त केला. मोठे लोक एकत्र झाल्याने कधीच निवडणुका जिंकल्या जात नाहीत, म्हणून त्यात काहीही संभ्रम नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर आमची नाराजी नाही, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय

महानगरपालिका निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबईची जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर दिली आहे. यावर शिवसेना आणि भाजप नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर आमची नाराजी नाही, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांना जबाबदारी दिल्यानंतर भाजप, शिवसेना नाराज या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमची नाराजी नाही, तो त्यांचा पक्षाचा निर्णय ते घेतील. राष्ट्रवादी पक्षाचा अंतिम निर्णय अजितदादा घेतील. त्यामुळंचं नवाब मलिक यांच्या निवडीच्या निर्णयावर आमचा बोलण्याचा अधिकार नाही. आमची नाराजी नाही, निश्चितच आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू असे बावनकुळे म्हणाले.

जिथे अजित पवार आमच्याशी चर्चा करतील तिथे ते आमच्या सोबत येणार

नांदेडमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत आरोप काहीही होतात. विरोधक निवडणूक हरतात, तेव्हाच असे आरोप पसरवले जातात. दरम्यान, झालेल्या आरोपांची निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशी करतील असेही बावनकुळे म्हणाले. उद्याचे निकाल आल्यानंतर आमची दिशा बदलणार नाही. राज्यात भाजप आणि शिंदेसेनेची चांगली महायुती होईल. जिथे अजित पवार आमच्याशी चर्चा करतील तिथे ते आमच्या सोबत येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राज्यात महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले

राज्यात महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला लगेच या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतना दिसत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.