नवनीत राणांना पक्षातून निष्कासित करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चंद्रशेखर बनकुळे म्हणाले….

अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल 2026: अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले, त्यांची नाराजी आहे. निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल, कोण विरोधात काम केले हेही तपासावं लागेल. पराभूत उमेदवाराणनी तक्रार केली आहे. आम्ही एक टीम अमरावतीत (Amravati Election Results 2026) पाठवू आणि त्यानंतर विश्लेषण करू. अशी अभिप्राय राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलीय.

मरावती महानगरपालिकेत (Amravati Municipal Corporation Election Results 2026)भाजपला अवघ्या 25 जागा मिळाल्याने भाजपमध्ये नवनीत राणा विषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. दुसरीकडे भाजपाच्या 22 उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवनीत राणा विरोधात तक्रार दाखल करत त्यांना निष्कसित करा, अशी मागणी केली आहे. या मागणीने भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान याच मुद्दयांवर आता भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत अभिप्राय दिली आहे.

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : झोपून उठल्यावर संजय राऊतांना तेच काम, सर्वाधिक गुंतवणूक आणणारं राज्य महाराष्ट्र

संजय राऊत यांना झोपून उठल्यावर तेच काम आहे, आरोप करण्याचे. देशात सर्वाधिक गुंतवणूक आणणारं राज्य महाराष्ट्र ठरतो आहे. मागच्या daओसच्या बैठकीत 17 लाख 50 हजार कोटीचे एमओयू झाले होते. त्यापैकी बहुतांशी प्रत्यक्षात उतरत आहेत. सर्व प्रकल्पांसाठी महसूल मंत्री म्हणून मी जागा देत आहे. सर्वाधिक जागा आम्हीच दिल्या आहेत्यामुळे. आमच्याकडून औद्योगिक प्रकल्पांसाठी जागा दिली जात आहे, याचाच अर्थ आहे की गुंतवणूक प्रत्यक्षात उतरत आहे. उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्ष आणि आमचे एक वर्ष याची तुलना केली तरी स्पष्ट होऊन जाईल. असे म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी खाविनम्र संजय राऊते आहेत टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Amravati Election Results 2026 : पराभूत उमेदवार काय म्हणाले?

शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होता असा आरोप भाजपच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे.नवनीत राणा यांनी भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.

Navneet Rana: नवनीत राणा काय म्हणाल्या?

मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही मी भाजपसाठी काम करते, असं नवनीत राणा यांनी म्हटलं. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून मी त्या दिवशी म्हटलं तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असं नवनीत राणांनी म्हटलं. नवनीत राणा पुढं म्हणाल्या की जरी युवा स्वाभिमान वेगळी लढली तरी आमची यारी पक्की आहे आणि मैत्री ही पक्की आहे. जे लोक बोलतात ते सोडून द्यावे लागते आपल्याला कामावर लक्ष करावे लागते. मला वाटत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अमरावतीमध्ये आम्हाला आवश्यकता राहील, असंही नवनीत राणांनी म्हटलं.

आणखी वाचा

BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?

आणखी वाचा

Comments are closed.