वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच भाजपची भूमिका, आम्ही त्यावर काम करतोय, बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण
चंद्रशेखर बावनकुळे : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. यामुळं राजकारण चांगलच तापलं आहे. यावर भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी भूमिका सष्ट केली आहे. वेगळ्या विदर्भाबाबत आमची भूमिका कायम आहे. यावर आम्ही काम करत आहोत असल्याचं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आजवर वेगळ्या विदर्भाबाबतच भूमिका मांडली असल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसने विचारलेल्या विदर्भाच्या मुद्द्यावर उत्तर देताना आमचा वेगळ्या विदर्भाचा अजेंडा कायम असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाजूची
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कांग्रेस पार्टी आता काढत आहे, मात्र हा मुद्दा आमचा आहे. भाजपच्या अजेंडाचा मुद्दा आहे. भाजपच्या अजेंडातून हा मुद्दा बाहेर गेलेला नाही आम्ही त्यावर पहिल्यापासूनच काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाजूची असल्याचे बावनकुळे म्हणाले.
पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे वातावरण अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच तापण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून विदर्भातील नागरिकांकडून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऐन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाची मागणी करीत पुन्हा एकदा हा मुद्दा मांडल्याने राजकारण तापले आहे.
नेमकं काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. वेगळा विदर्भ आम्हाला हवाय कारण आताच्या सामाजिक समीकरणानुसार विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिले आहे. विदर्भात मिश्र समाज आहे. या समाजांच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. जोपर्यंत सत्तेत सहभागी होत नाही, तोपर्यंत त्या भागाला न्याय दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ (Separate Vidarbha) झाला पाहिजे, ही आमची मागणी असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
वेगळ्या विदर्भाची मागणी येथील नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसापासून केली जात आहे. त्याकडे आतापर्यंतच्या राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ऐन अधिवेनाशन काळातच हा मुद्दा पुन्हा चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी “वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्रात एका विशिष्ट समाजाचे प्राबल्य वाढल्याचा आरोपही यावेळी केला. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
Vijay Wadettiwar: वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, ‘माझा व्हिजन’मध्ये विजय वडेट्टीवारांची मोठी मागणी, ‘जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये नाही’
आणखी वाचा
Comments are closed.