चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इ

अकोला : प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या अनेक खाणीआहेत. त्यावर बावनकुळेच्या जगदंबा ट्रॅव्हल्सचे किती ट्रक चालतात, याची माहिती काढा, असं आव्हान बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) दिलं आहे. 16 तारखेच्या मतमोजणीनंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या संदर्भातील पुरावे जाहीर करू, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान भाजपवाल्यांना एक दिवस लोक रस्त्यावर मारतील असा दावागी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे.

Bachchu Kadu:  नेमकं काय म्हणालेत बच्चू कडू?

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, भाजपा खूप पैसा वापरत आहे आणि वाटतही आहे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे नोटाबंदी मध्ये भाजपने लुटलच आहे, त्यांनी कशात लुटलं नाही सांगा बरं, असं एक उदाहरण सांगा ज्यामध्ये भाजप पैसे खात नाही, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या किती खदानी आहेत आणि किती ट्रक चालतात, जगदंबा ट्रॅव्हल्स कंपनीचे ते एकदा पहा तुम्ही, कार्यकर्त्याला तिकीटही द्यायचं नाही आणि पैसाही द्यायचा नाही, आणि प्रभू रामचंद्राच्या नावावर मतं मागायचे, इथे एक कार्यकर्ता आहे तो किती वर्षापासून काम करतो त्याला का तिकीट दिलं नाही, गेली 40 वर्षात तो तिथे काम करत होता, ते पैसे वाल्यांना तिकीट देत आहेत, असंही बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटलं आहे.(Chandrashekhar Bawankule)

Bachchu Kadu: आमची सत्ता केंद्रात आणि राज्यात असती तर आम्ही रिक्षावाल्यांना महापौर केला असता

तर आमची सत्ता केंद्रात आणि राज्यात असती तर आम्ही रिक्षावाल्यांना महापौर केला असता, ती ताकद ठेवली असती, पण यांची मर्दानगी संपली आहे, लोकं एक दिवस प्रभू रामचंद्राचा धनुष्य घेऊन यांच्याच खोपडीत घालणार आहे, आणि तेही हिंदूच घालणार, अशी वाईट अवस्था येईल एक दिवस, लोकांना भाजप म्हटलं की ते लोक असे मारतील की, सोडणारच नाहीत, माझ्याकडे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे पुरावे आहेत बाकीच्यांचे भेटले की तुम्हाला सांगतो, निकाल लागल्यानंतर सगळं आपण जाहीर करू, असं माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.