चेंबूर दुर्घटना अहवालावरून पुन्हा सत्ताधारी विरुद्ध प्रशासन आमनेसामने; अहवाल आधी माध्यमांत गेल्

चेंबूर स्कूल बस अपघात मुंबई : चेंबूरमधील वृक्ष दुर्घटनेनंतर (Chembur Accident) तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालावरून मुंबई महानगरपालिकेत (BMC) सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. चौकशी अहवाल (Chembur Accident Report) सत्ताधाऱ्यांनी फेटाळल्यानंतर आता तो नियमानुसार संबंधित समित्या आणि लोकप्रतिनिधींसमोर सादर करण्याऐवजी थेट माध्यमांमध्ये कसा पोहोचला, यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेच्या प्रचलित प्रक्रियेनुसार असा अहवाल प्रथम उद्यान विभाग, स्थायी समिती तसेच महापौरांकडे (Ritu Tawde)  सादर होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित लोकप्रतिनिधींना अहवालाची माहिती मिळण्यापूर्वीच तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने सत्ताधारी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Chembur School bus Accident Report Controversy)

Chembur Accident Report: लोकप्रतिनिधींना डावलून अहवाल माध्यमांकडे गेला कसा? याची चौकशी झाली पाहिजे

दरम्यानसत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकप्रतिनिधींना डावलून अहवाल माध्यमांकडे कसा गेला, याची चौकशी झाली पाहिजे. प्रशासनाने नियमानुसार प्रक्रिया न पाळल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. याआधीही चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालातील निष्कर्षांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत अहवाल नाकारला होता. आता अहवाल प्रसिद्ध झाल्याच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचे चित्र मुंबई महापालिकेत पाहायला मिळत आहे.

Mayor Ritu Tawde : अधिकृत अहवाल माझ्याकडे अद्याप आलेला नाही

उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला यांनी यावर बोलताना सांगितलं ते‘मला मान्य आहे की हा अहवाल सर्वप्रथम आमच्याकडे आला नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे. आम्ही या अहवालाचा निषेध करतो. हा अहवाल योग्य नाही. सर्वप्रथम हा अहवाल आमच्याकडे येणे गरजेचे होते.” तर सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले ते‘नक्कीच, जे काही चुकीचे सुरू आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. मी, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि आम्ही सर्वजण या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत.’ असेही ते म्हणाले. तर महापौर रितू तावडे म्हणाल्या ते‘माझ्याकडे हा अहवाल अधिकृतपणे आलाच नाही. माझ्याकडे जो अहवाल व्हॉट्सॲपवर दुसऱ्यांकडून प्राप्त झाला, त्याच आधारे मी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. अधिकृत अहवाल माझ्याकडे अद्याप आलेला नाही.’ असेही त्या म्हणाल्या.

Chembur Tree Collapse: आमच्या मुलाच्या हत्येला BMC जबाबदार; चेंबूर दुर्घटनेतील विहानचे पालक आक्रमक

मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा वर्षांच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला. त्यामुळं विहानच्या आईवडीलांवर आधीच दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण या प्रकरणात मुंबई महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीनं दिलेल्या अहवालानं श्रीवास्तव दाम्पत्याला आणखी एक धक्का बसला. या चौकशी समितीच्या अहवालात महापालिका अधिकाऱ्यांसह उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळं या प्रकरणात पुन्हा चौकशी करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल अशी प्रतिक्रिया श्रीवास्तव दाम्पत्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.