17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकल
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग न्यूज : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारे संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी चेन्नईच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि प्रदीर्घ काळाची भागीदारी संपुष्टात आली आहे.
अधिकृत घोषणा
सुपर किंग्ज आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी परस्पर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
एकत्र, आम्ही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी आणि चिरस्थायी भागीदारी शेअर केली. तुम्ही तयार केलेला वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील.अपार आदराने आणि… pic.twitter.com/qjvb4oZUuU
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) 13 जुलै 2026
खेळाडू ते यशस्वी प्रशिक्षक; 17 वर्षांचा सुवर्णकाळ
स्टीफन फ्लेमिंग 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्समध्ये एक खेळाडू म्हणून सामील झाले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. पुढील 17 वर्षांत त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली चेन्नई सुपर किंग्सला क्रिकेट जगतातील सर्वात सातत्यपूर्ण आणि आदरणीय संघ बनवले.
स्टीफन फ्लेमिंगने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळाडू म्हणून एन्ट्री घेतली. त्यानंतर 2009 मध्ये त्याने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. तब्बल 17 वर्ष तो या फ्रँचायझीसोबत राहिला. त्याच्या मार्गदर्शनालाखी सीएसकेने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या, तर 2 वेळा चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धा नावावर केली. सलग 12 वेळा या संघाने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करताना 10 वेळा अंतिम सामना खेळला.
सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. विश्वनाथन म्हणाले की, “फ्लेमिंग यांनी केवळ आपण कसे खेळलो हेच नाही, तर एक फ्रँचायझी म्हणून आपल्याला काय बनायचे आहे हे देखील निश्चित केले. त्यांनी सातत्य, नम्रता आणि संघाला प्राधान्य देणारी संस्कृती निर्माण केली. संपूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे.”
“सीएसके नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील” – स्टीफन फ्लेमिंग
या निरोपावर भावूक होत स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, “क्रीडा क्षेत्रात 18 वर्षे (खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून) हा एक मोठा काळ आहे. मी केवळ कृतज्ञतेची भावना घेऊन इथून जात आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबत घालवलेला वेळ माझ्या कोचिंग कारकिर्दीतील सर्वात मोठा बहुमान आहे. आम्ही मिळवलेल्या यशाचा मला अभिमान आहे. आम्ही अविस्मरणीय विजय साजरे केले, कठीण प्रसंगांवर मात केली आणि अनेक आठवणी गोळा केल्या. सीएसके नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील आणि मी आगामी काळातही संघाला पाठिंबा देत राहीन.”
🚨 स्टीफन फ्लेमिंग यांचे अधिकृत विधान:
“अठरा वर्षे हे खेळातील आयुष्यभर आहे, आणि मी कृतज्ञतेशिवाय काहीही सोडत नाही. चेन्नई सुपर किंग्जसोबतचा माझा वेळ हा माझ्या कोचिंग कारकिर्दीचा विशेषाधिकार आहे. आम्ही जे काही मिळवले त्याचा मला अभिमान आहे – एकत्र, आम्ही साजरा केला… pic.twitter.com/opSN1Fzn3Z
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 13 जुलै 2026
हे ही वाचा –
Comments are closed.