मोठी बातमी! स्टीफन फ्लेमिंगने सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. सुपर किंग्ज आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात यशस्वी आणि दीर्घकाळ टिकलेल्या भागीदारींपैकी एकाचा शेवट झाला आहे.
सीएसकेपासून विभक्त होण्याबाबत फ्लेमिंगने म्हटेल, “खेळाच्या जगात अठरा वर्षे हा एक मोठा कालखंड असतो आणि मी निरोप घेताना केवळ कृतज्ञतेची भावना बाळगत आहे. चेन्नई सुपर किंग्जसोबतचा माझा कार्यकाळ हा माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील एक अत्यंत अभिमानास्पद अनुभव राहिला आहे. आम्ही मिळवलेल्या यशाचा मला सार्थ अभिमान आहे.”
“आम्ही मिळून अविस्मरणीय विजय साजरे केले, कठीण प्रसंगांवर मात केली आणि अशा आठवणी निर्माण केल्या ज्या माझ्यासोबत सदैव राहतील. सीएसके (CSK) नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील आणि आगामी काळातही मी या संघाला नेहमीच प्रोत्साहन देत राहीन,” असेही फ्लेमिंगने पुढे म्हटले आहे.
फ्लेमिंगचा कार्यकाळ
फ्लेमिंग आयपीएलच्या पहिल्याच आवृत्तीपासून (२००८) सीएसकेशी जोडले गेले. २००८ मध्ये खेळाडू म्हणून तर २००९ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून कारभार स्वीकारला. त्याच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने ५ आयपीएल ट्रॉफी आणि २ चॅम्पियन्स लीग ट्वेंटी २० स्पर्धा जिंकल्या. तसेच संघाने १२ वेळा आयपीएल प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला आणि १० वेळा अंतिम सामना खेळला.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.