LSG vs CSK: लखनऊवर दणदणीत विजय मिळवत चेन्नईने रचला नवा इतिहास! 8 वर्षांनंतर केला 'असा' थरारक रन चेज

चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त कामगिरी करत लखनऊ सुपर जाएंट्सचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात उर्विल पटेलने (urvil patel) झंझावाती फलंदाजी करत ऐतिहासिक अर्धशतक ठोकले आणि चेन्नईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. चेपॉकच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 203 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 4 चेंडू राखून विजय मिळवला.

चेन्नईसाठी हा विजय अत्यंत खास आहे, कारण तब्बल 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांनी अशी कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने यापूर्वी 2016 मध्ये 180 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना मोठे आव्हान मिळाले, तेव्हा संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर आयपीएल 2026 मध्ये हा दुर्दैवी सिलसिला तुटला आहे. चेन्नईच्या आयपीएल इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा यशस्वी रन चेज ठरला आहे.

या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सची पॉइंट्स टेबलमधील स्थिती अधिक मजबूत झाली आहे. त्यांनी या हंगामात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले असून त्यात 6 विजय तर 5 पराभव पत्करले आहेत त्याचबरोबर त्यांचे आता एकूण 12 गुण झाले आहेत.

चेन्नईला आता प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी उर्वरित सामन्यांपैकी किमान 2 सामने जिंकणे आवश्यक आहे. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली संघाने या हंगामात तरुण खेळाडूंच्या जोरावर शानदार कामगिरी केली आहे.

Comments are closed.