आयपीएल पुन्हा गालबोट लागलंच…. BCCIने सांगून पण नियम धाब्यावर, CSK vs LSG सामन्यात डगआउटमध्ये
CSK vs LSG IPL 2026 नवीन वाद : रविवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल सामन्यात नव्या वादाला तोंड फुटलं. सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात एक व्यक्ती मोबाईल फोन वापरताना दिसल्याचा दावा करण्यात आला असून सोशल मीडियावर यावरून मोठी चर्चा रंगली आहे.
🚨 आयपीएल अखंडता प्रश्नात आहे? 🚨
अविश्वसनीय! CSK विरुद्ध LSG चकमकीदरम्यान लखनऊ सुपर जायंट्सच्या अधिकाऱ्याच्या सुरक्षेतील आणखी एक त्रुटी मोबाईल फोनवर दिसली. या हंगामात ही पहिलीच वेळ नाही – बीसीसीआय नक्की काय करत आहे? सतत प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे… pic.twitter.com/y8uvPH0Bv3
— क्रिकेट सेंट्रल (@CricketCentrl) 10 मे 2026
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती लखनऊ सुपर जायंट्सच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. टीव्ही प्रसारणादरम्यान कॅमेरा लखनऊच्या डगआउटकडे वळला असता ती व्यक्ती कथितरित्या फोनवर बोलताना दिसली. मात्र, तो भाग खरोखर डगआउटच होता की स्टेडियममधील एखादा व्हीआयपी विभाग, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. संबंधित व्यक्तीची ओळख किंवा घटनेची अधिकृत पुष्टीही झालेली नाही.
आयपीएल टीमसाठी बीसीसीआयचा नियम हा विनोद आहे 🤯
– या LSG स्टाफ सदस्याला सामन्यादरम्यान त्याचा फोन वापरण्याची परवानगी कशी आहे? pic.twitter.com/4Ap6h4rZ5x
— सॅम (@Cricsam01) 10 मे 2026
बीसीसीआयचे नियम काय सांगतात?
बीसीसीआयच्या पीएमओए (Player and Match Officials Area) नियमांनुसार, टीम मॅनेजरला ड्रेसिंग रूममध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी असते. मात्र डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई आहे. स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने मोबाईल, स्मार्टवॉच आणि इतर कम्युनिकेशन डिव्हाइस जमा करणे बंधनकारक असते. फक्त अधिकृत विश्लेषकांनाच त्यांच्या सिस्टमचा वापर करण्याची मुभा असते.
LSG DUGOUT मध्ये मोबाईल वापरणे 😱
– आरआर मॅनेजरने ड्रेसिंग रूममध्ये मोबाईल वापरला.
– मोबाइल वापरून एलएसजी टीम मॅनेजमेंट सदस्य.
– रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये वाफ काढताना.
– युजी चहलची वाफ काढण्याची घटना.बीसीसीआय काय करत आहे? pic.twitter.com/5GflZWiKgr
— विकास (@Vikas662005) 10 मे 2026
याआधीही झाली होती कारवाई
याआधी राजस्थान रॉयल्स संघाचे टीम मॅनेजर रोमी भिंडर यांच्यावर डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याप्रकरणी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुवाहाटीमध्ये रॉयल चैलेंजर्स बेंगलुरुविरुद्धच्या सामन्यात ही घटना घडली होती.
सामन्यात सीएसकेचा थरारक विजय
उर्विल पटेलच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 5 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत 8 बाद 203 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 19.2 षटकांत 5 विकेट्स गमावून 208 धावा करत सामना जिंकला. 2019 नंतर प्रथमच सीएसकेने 180 पेक्षा मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
या विजयासह चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. 11 सामन्यांत 6 विजय आणि 5 पराभवासह चेन्नईचे 12 गुण झाले आहेत. उत्तम नेट रनरेटमुळे त्यांनी राजस्थान रॉयल्सला मागे टाकलं. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली असून 11 सामन्यांत फक्त 3 विजयांसह 6 गुण मिळवत संघ तळाशी 10व्या स्थानावर आहे.
हे ही वाचा-
आणखी वाचा
Comments are closed.