पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे सांगितलंय ‘ते’ पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन

देवेंद्र फंदवीस: नागपूर : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या झळा आजही देशवासीयांना बसत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल आणि डिझेलची कमतरता जाणवत असून अद्यापही घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली असली तरीही गतकाळातील आणि भविष्यातील परिस्थितीमुळे देशवासीयांना काही बंधने घालून पुढे जावे लागेल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज देशवासीयांना काही महत्त्वाची आवाहनं केली आहेत. त्यामध्ये, वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केलंय. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचे आवाहन योग्य असल्याचं म्हटलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे, ते योग्य आहे. गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर वापर करायला हवा, असे म्हणत मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. जगभरात अमेरिका,इस्रायरण-इराण युद्धामुळे तेल आणि गॅसच्या इंधन पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. आपल्या बाजूच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात किल्लत आहे. पाकिस्तानमध्ये साडेचारशे रुपये प्रति लिटर तेलाचे भाव झाले आहेत. मात्र, आपल्या प्रधानमंत्री यांनी कुठल्याही पद्धतीने पुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण, ही अडचण जर आपण समजली नाही आणि याचा उपयोग योग्य प्रमाणात नाही केला, तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे, पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय, त्यावर सर्व देशवासीयांनी अंमलबजावणी करावी, असे फडणवीसांनी म्हटले.

काय म्हणाले, पंतपधान (Narendra modi appeal people for petrol diesel)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. पंतप्रधान हैदराबादमध्ये म्हणाले की, आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथे लोकांनी तिचा वापर करावा. आज आपल्याला बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेली 9 आवाहने

1.पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत
2.खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा
3.पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका
4.वर्षभर परदेशी प्रवास टाळा
5.कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे
6.परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
7.जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा
8.वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या
9.परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा

हेही वाचा

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी

आणखी वाचा

Comments are closed.