प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले DCM

सातारा: तामिळनाडूत आज थपलती विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. विजय यांच्या शपथविधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. तर, काल पश्चिम बंगालचे (West bengal) नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यालापंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिग्गजांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) स्टेजवरील उपस्थितांची भेट घेतली. त्यावेळी,

पंतप्रधान मोदी हे स्टेजवरील प्रत्येकापाशी थांबून त्यांना अभिवादन करत पुढे केले, ते प्रत्येकाला अभिवादन करत पुढे जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यापाशी येताच मोदी बराच वेळ थांबले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. पंतप्रधान मोदी बराचवेळ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलत होते, त्यांचा हात हातात घेतला. दोघांमध्ये हास्यविनोद झाला आणि नेहमीप्रमाणे खांद्यावर थाप मारुन मोदी पुढे निघून गेले. मोदी-शिंदेंच्या या केमिस्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या दोघांच्या केमिस्ट्रीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. तसेच, मोदींनी नेमकं काय चर्चा केली, याची उत्सुकताही सर्वांना लागली. आता, स्वत: एकनाथ शिंदेंनी मोदी भेटीचा किस्सा सांगितला. तसेच, मोदींनी काय म्हटले, आस्थेवाईकपणे विचारपूस का केली, हेही सांगितले.

मोदी एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले (मोदी एकनाथ शिंदे बोलतात)

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी वेळी पंतप्रधान यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या चर्चेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझ्यावर प्रेम आहे. मुंबईमध्ये हवामान खराब झाल्याने मला एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना हेलिकॉप्टर अचानक लँड करावे लागले होते. याबाबत मोदींनी विचारणा केली. त्यांना माझी काळजी वाटली म्हणून त्यांनी विचारपूस केली, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी आज सातारा दौऱ्यावर आले असता दिली.

साताऱ्यात शिवसागर जलाशयावर पूल (Satar shivsagar lake)

साताऱ्यातील कोयना धरणाचा शिवसागर जलाशयावर एक भव्य पूल  होतो आहे. सोळशी आणि कांदाट खोऱ्याला जोडणारा हा 540 मीटर लांबीचा पूल असून या पुलासाठी तब्बल 175 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झालं  असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाची आज पाहणी केली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती देखील घेतली. ह्या पुलामुळे दुर्गम भागात पर्यटन वाढणार असून या भागातील तरुणांना याच ठिकाणी रोजगार मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा

शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.