सहाव्या फेरीत चारही हिंदुस्थानी खेळाडू पराभूत
हिंदुस्थानी खेळाडूंसाठी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहावी फेरी निराशाजनक ठरली. स्पर्धेत सहभागी असलेल्या चारही हिंदुस्थानी खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. मागील फेरीत दमदार कामगिरी करणाऱ्या विद्यमान जगज्जेत्या डी. गुकेशची विजयाची मालिका खंडीत झाली, तर आर. प्रज्ञानंद, दिव्या देशमुख व कोनेरू हम्पी यांचाही पराभव झाला.
पुरुष गटात वेस्ली सो याने क्लासिकल सामन्यात प्रज्ञानंदचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात विंसेंट कीमर याने गुकेशच्या चुका अचूकपणे साधत महत्त्वपूर्ण विजय मिळवला. मॅग्नस कार्लसनने अलीरेझा फिरौझा याचा क्लासिकल सामन्यात पराभव करून विजयी पुनरागमन केले. महिला गटात विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिला चीनच्या पाच वेळच्या विश्वविजेत्या जू वेंजून हिच्याकडून क्लासिकल सामन्यात पराभव पत्करावा लागला. असौबायेवाने आर्मागेडन टायब्रेकमध्ये हम्पीचा पराभव केला. हम्पी सध्या 5.5 गुणांसह स्पर्धेत कायम आहे.
Comments are closed.