रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावू

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची प्रेमानंद महाराजांची भेट : स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल 2026 (IPL) च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) चॅम्पियन बनवलं. त्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी सोमवारी वृंदावन गाठले. दोघांनी आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या ‘राधा केली कुंज’ आश्रमाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

विराट आणि अनुष्का यांच्या या आध्यात्मिक भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आश्रमातून बाहेर पडताना हे अगदी साध्या कपड्यांमध्ये दिसले, तसेच त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. विराट आणि अनुष्का अनेकदा वृंदावनला भेट देत असतात. प्रसिद्धी आणि यशाच्या पलीकडे जाऊन आयुष्य कसे जगावे, याचे धडे घेण्यासाठी हे दोघे प्रेमानंद महाराजांच्या विचारांचे श्रवण करत असल्याचे सांगितले जाते.

विजयाचा अनोखा जल्लोष (Virat Kohli Celebration IPL 2026)

आरसीबीला पहिला-वहिला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला. यात ती विराटच्या कपाळावर किस करताना दिसत असून दोघांच्या हातात आयपीएलची ट्रॉफी आहे. याशिवाय, एका व्हिडिओमध्ये विराट मनसोक्त डान्स करताना दिसला, ज्याचे शूटिंग अनुष्का करत होती. या सेलिब्रेशनमध्ये आरसीबीचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकनेही विराटला साथ दिली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याने चौकार आणि षटकार ठोकत 12 चेंडू राखून आरसीबीला विजय मिळवून दिला.

सामन्यानंतर विराट झाला भावूक  (Virat Kohli RCB IPL 2026)

सामन्यानंतर विराट भावूक झाला होता. तो म्हणाला, “या संघात कमालीचे संतुलन आणि ताकद आहे. यंदा मला कोणत्याही दबावाचा अनुभव आला नाही, कारण आम्हाला आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिलो कारण आम्ही आमच्या योजनांची अचूक अंमलबजावणी केली. जेव्हा आम्ही आमचा स्वाभाविक खेळ खेळतो, तेव्हा आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम संघ असतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले.”

वैयक्तिक आयुष्य

विराट आणि अनुष्का 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. यांना ‘वामिका’ नावाची मुलगी आणि ‘अकाय’ नावाचा मुलगा आहे. कौटुंबिक आणि आध्यात्मिक शांततेसाठी हे जोडपे नेहमीच ओळखले जाते.

हे ही वाचा –

IPL 2026 Flop Players : 15 कोटींहून जास्त पैसे घेतले, पण फँचायझीला चूना लावून गेले; IPL 2026 मधील सर्वात महागडे ‘हे’ 5 खेळाडू ठरले फ्लॉप

आणखी वाचा

Comments are closed.