छगन भुजबळांनी अचानक निर्णय बदलला, कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार

छगन भुजबाल: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश (GR) जारी केला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. यामुळे ओबीसी संघटना मात्र सरकारवर नाराज होताना दिसत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या जीआरला विरोध दर्शवला आहे. दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका देखील दाखल करणार आहेत. तर आज  (9 सप्टेंबर)  राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्वाची बैठक होणार आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीवर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातील छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांनी आपला निर्णय अचानक बदलला आहे.

छगन भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळात बैठकीला अनुपस्थित राहणार अशी माहिती सुरुवातील समोर आली होती. उपसमितीच्या शिफारसीनुसार काढण्यात आलेला शासन निर्णयाचा निषेध करण्याची छगन भुजबळ अनुपस्थित राहणार असे बोलले जात होते. राष्ट्रवादी पक्षाच्या प्री कॅबीनेट बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार पण मुख्य बैठकीला मात्र अनुपस्थित राहणार असे बोलले जात होते.

छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार

आता  मंत्री छगन भुजबळांनी अचानक आपला निर्णय बदलला आहे. छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  मंत्रिमंडळ बैठकीनंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शासन निर्णय संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

दरम्यान, आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. आज प्री कॅबिनेट बैठकीला चाललो आहे. उद्या उपसमितीची बैठक आहे. मराठा समाजात देखील मतभिन्नता आहे. कोण म्हणत जीआरचा फायदा होणार आहे, तर कोण म्हणत फायदा होणार नाही. यात राजकारण आणू नका. हा सामाजिक विषय आहे. माझ्याकडे ओबीसी नेत्यांची मीटिंग झाली. त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की, कोणीही वाद घालायचा नाही. सध्या ओबीसी नेत्यांमध्ये आक्रोश आहे. तो दाखवणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=yblz84wqzgu

आणखी वाचा

OBC Reservation: आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, तायवाडे म्हणाले, “भुजबळ-वडेट्टीवारांनी समाजाची दिशाभूल करु नये”

आणखी वाचा

Comments are closed.