तोतया IAS महिलेच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या अधिकाऱ्यांचे नंबर, डिलिट केलेले चॅट, गुप्त


छत्रपती संभाजीनगर: आयएएस अधिकारी असल्याचे भासवून सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime news)वास्तव्यास राहिलेल्या कल्पना त्रिंबकराव भागवत प्रकरणाने आता राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निर्माण केला आहे. तिच्या मोबाईलमधून पाकिस्तान आर्मीचे संपर्क, अफगाणी नेटवर्कशी संवाद, हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठ्या आर्थिक हालचाली उघड झाल्याने तपास अधिक गंभीर झाला आहे. घरातील झडतीत 19 कोटींचा चेक, संशयास्पद प्रमाणपत्रे तसेच परदेशी नंबरशी नियमित संपर्क अशा गोष्टी पोलिसांच्या हाती आल्या आहेत.त्यामुळे या प्रकरणाला गुप्तहेरगिरीची छटा असल्याचा संशय अधिक बळावला आहे. दरम्यान बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी तीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.ढी जवळगेकर यांच्या समोर हजर केले असता 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनवण्यात आली.(Chhatrapati Sambhajinagar Crime news)

Chhatrapati Sambhajinagar:  प्रकरणात आत्तापर्यंत समोर आलेली माहिती

१. आयएएस अधिकारी असल्याचा आव आणून सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली. राजदूत येणार असल्याच्या काळात हॉटेल तपास दरम्यान २२ नोव्हेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
२. शहरातील पडेगाव परिसरात घर असल्याचे समोर आले तर अफगाणिस्तानचा तिचा प्रियकर असल्याचे समोर आले.
३.  मोबाईल जप्त; पाकिस्तान पेशावर आर्मी, अफगाण ॲबेसी व ११ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले एका चॅटमध्ये मजकूर होता की, आपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना असा उल्लेख.
४. अफगाणी प्रियकर अशरफ व त्याचा पाकिस्तानी भाऊ गालीब यमा यांच्याशी व्हॉटसअ‍ॅप कॉलवर संपर्क सुरू होता.
५.  घर झडतीतून  १९ कोटींचा चेक त्यावर चेतन सुंदरजी भानुशाली या व्यक्तीने दिला असून त्यावर निखील भाकरे आणि कल्पना भागवत असे नावे असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. ६ लाखांचा दुसरा चेक; खात्यात ३२.६८ लाखांची नोंद
६. नागपूर विद्यापीठाच्या लेटरहेडवर बेस्ट आयएएस अधिकारी असा संशयास्पद सर्टिफिकेट, दिल्ली, मणीपूर, उदयपूर, जोधपुरकडे वारंवार विमानप्रवास

Chhatrapati Sambhajinagar: कोर्टात सरकारी पक्षाची बाजू

– आरोपीने चॅट हिस्ट्री मोठ्या प्रमाणात डिलीट केली; ती पुनर्प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास आवश्यक आहे.
– पाकिस्तानी आर्मीचे नंबर, डीलर पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख आणि आंतरराष्ट्रीय संपर्क सुरक्षा धोकादायक आहे.
– १९ कोटींचा चेक आणि खात्यातील ३२ लाखांचा स्रोत संशयास्पद, नेमका संबध काय याचा तपास करणे गरजेचे आहे.
– बॉम्बस्फोटाच्या काळात तिचे दिल्ली-मणिपूर-दिल्ली प्रवास जुळत असल्याने विशेष तपास आवश्यक आहेत.
– प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले जाऊ शकते; अधिक कोठडी गरजेची आहे

Chhatrapati Sambhajinagar:  कोर्टात बचाव पक्षाची बाजू

– आरोप अतिशयोक्तीपूर्ण आणि चुकीच्या अर्थाने लावलेले आहेत.
– पाकिस्तान किंवा अफगाण नंबर असणे गुन्हा नाही.
– १९ कोटींचा चेक, व्यवहार नसल्यास गुन्हा सिद्ध होत नाही.
– संशयास्पद सर्टिफिकेट तिने बनवले असा पुरावा नाही.
– पोलिसांनी मानसिक दबाव आणला; तपासात पूर्वग्रह असल्याचे बचाव पक्षाने मांडले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.