सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण, दीड लाख रुपयांना विक्री, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजिनगर गुन्हेगारी बातम्या: सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करुन हैदराबादमधील व्यापाऱ्याला दीड लाख रुपयांत विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध करत आरोपींना जेरबंद केलं आहे. जाणून घेऊयात याबबत सविस्तर माहिती.

गुजरातमधील अहमदाबादच्या ढोलका परिसरातून सहा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करुन हैदराबादमधील व्यापाऱ्याला दीड लाख रुपयांत विक्रीचा सौदा ठरला होता. मुलीचे अपहरण केल्यावर आरोपी छत्रपती संभाजीनगर मार्गे रेल्वेने हैदराबादला निघाले होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याचे निष्पन्न होताच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पथक तातडीने रेल्वेस्थानकावर पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजच्या वर्णनावरून आरोपी मनीषा, बिमलसोबत जयेशही मिळून आला. त्यानंतर चिमुकलीला ताब्यात घेत सर्वांना अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Amravati Crime : अमरावतीत महिला पोलीसाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू; गळ्यावर व्रण, पोलीस पतीला अटक, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.