प्लॉट बघण्यासाठी गेलेल्या महिलेचा आधी पाठलाग, नंतर विनयभंग; स्थानिकांनी तरुणाला जागेवरच चोपला
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरमधून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत असताना संतापजनक प्रकार घडलाय .कुटुंबासोबत प्लॉट बघण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाठलाग करत भर रस्त्यावर विनयभंग केलाय . महिलेने आरडाओरड करताच संतप्त स्थानिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आहे . 19 वर्षांचा आरोपी तरुण छत्तीसगडचा रहिवासी असल्याचं कळतंय . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती . छत्रपती संभाजीनगरच्या गोळेवाडी परिसरात भर दुपारी हा प्रकार घडलाय .
नेमकं घडलं काय ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळेवाडी परिसरात प्लॉट बघण्यासाठी गेलेल्या तरुणीचा एका तरुणाने पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे .अभिषेक रामफल कैवत्य ( वय 19) असे आरोपीचे नाव असून हा तरुण छत्तीसगडचा रहिवासी असल्याचं समोर येत आहे .विवाहित महिलेच्या मैत्रिणीला प्लॉट खरेदी करायचा असल्याने पीडित महिला कुटुंबीयांसह प्लॉट पाहण्यासाठी गेले होते .प्लॉट पाहण्यासाठी सर्व सदस्य रस्त्यावर उभे असताना दोन तरुण कार्ड ओरड करत त्या ठिकाणाहून जात होते .यातील एका तरुणाने विवाहितेच्या मागे जात तिची छेड काढली .
या घटनेनंतर महिलेने आरडा ओरड करतात आजूबाजूच्या स्थानिकांनी धाव घेत विनयभंग करणाऱ्या तरुणाला पकडत त्याला चांगलाच चोप दिला . पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथील रहिवासी असणारा हा तरुण काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात मोलमजुरी करून उपजीविका भागवतो . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी तरुणाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे .
बायकोला म्हणाला तासाभरात घरी येतो अन्..
छत्रपती संभाजीनगरात एका उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली सागर रामभाऊ परळकरयांचा मृतदेह सापडला. सागर परळकर हे वाळूज एमआयडीसीतील पुष्पक ऍग्रो कंपनीचे संचालक होते. मृतदेहाजवळ त्यांची दुचाकी अपघातग्रस्त स्थितीत आढळून आली. त्यांच्या मोबाईल व आधार कार्डवरून ओळख पटवण्यात आली. सागर परळकर रविवारी दुचाकीने कन्नडकडे गेले होते. घरी जाण्याआधी पत्नीला फोन करून “मी तासाभरात पोहोचतो” असं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर ते परतलेच नाहीत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास करोडी टोलनाक्याजवळील पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या अवस्थेवरून नेमकं हे अपघात आहे की घातपात, यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.