छत्रपती संभाजीनगरातील रांजणगावा शेणपुंजीत बापलेकाची चाकूने भोसकून निर्घुन हत्या, तिन्ही आरोपींचा शोध सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

किरकोळ कारणावरून रांजणगाव शेणपुंजी येथे बाप लेकाची निर्घुण हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा भल्या पहाटे रांजणगावत दाखल झाला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव शेणपुंजी येथील जागृत हनुमान मंदिरा शेजारी गायचंद आणि किर्तीकर हे दोन्ही कुटूंब राहतात. या दोन्ही कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी मध्यरात्री या कुटुंबात पुन्हा वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. गायचंद कुटूंबातील शेजारी राहणारे आरोपी राजेंद्र गायचंद, नागेश गायचंद व मयूर गायचंद (सर्व रा. रांजणगाव) या तिघांनी धारदार चाकूने बाबासाहेब कीर्तीकर व त्यांचा मुलगा निहाल बाबासाहेब कीर्तीकर (रा. कृष्णानगर, जागृत हनुमान मंदिर, रांजणगाव शेणपुंजी) यांच्यावर वार केला. या हल्ल्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. यावेळी झालेल्या रक्तस्त्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला तर आणखी एक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जखमी अवस्थेत असलेल्या कीर्तीकर कुटुंबातील दोघांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसासह स्थानिक पोलिसांनी आरोपींचा शोधा सुरू केला आहे.

Comments are closed.