छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषदेच्या ६५५ शाळांचा शून्य टक्के निकाल; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जि.प.चे ११५७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
>> प्रकाश जोशी
पूर्व उच्च प्राथमिक ५ वी व पूर्व माध्यमिक ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हयाने ५ वीमध्ये राज्यात १० वा तर ८ वीमध्ये १४ वा क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानकारक निकाल असतानाही जिल्हा परिषदेच्या २०८० पैकी ६५५ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. यामुळे जि.प. शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे शून्य टक्क्याच्या ६५५ शाळा असताना जि.प.च्या १५३ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असून, जि.प. शाळांतील ११५७विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. गुणवत्तेचा झेंडा फडकविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, गोरगरिबांसाठी असलेल्या या शाळा टिकाव्यात, यासाठी शिक्षकही प्रयत्न करीत असताना ६५५ शाळांनी भोपळाही फोडला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गंगापूर व वैजापूर या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी ८४ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल पैठण तालुक्यातील ७९, फुलंब्री ५६, कन्नड ४६, सिल्लोड ४०, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३१, सोयगाव २९ तर रत्नपूर तालुक्यातील १५ अशा जिल्ह्यातील ४६५ शाळांतील एकही विद्यार्थी या परीक्षेत पास होऊ शकला नाही. विशेष म्हणजे भोपळाही न फोडणाऱ्या शाळांमध्ये वाळूज, लासूर स्टेशन, शेंदूरवादा, साजापूर, शिंदोन, बहिरगाव, जेहूर, देवगाव रंगारी, जायकवाडी, बाबरा, भडजी, अजिंठा, सोयगाव या जि.प. शाळांचा समावेश आहे.
191 शाळा 8वीत नापास झाल्या
पूर्व माध्यमिक ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यातील १९१ शाळांनी भोपळाही फोडलेला नाही. गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक ३८, वैजापूर ३५, छत्रपती संभाजीनगर २६, कन्नड, २३, पैठण २०, सिल्लोड १८, फुलंब्री १४, रत्नपूर १० आणि सोयगाव तालुक्यातील ७ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. यामध्ये पाटोदा, छावणी, ढोरेगाव, गंगापूर, देवळाणा, हतनूर, ताजनापूर, पैठण जि.प. मुले – मुलांची प्रशाला, वैजापूर मुलींची प्रशाला, बोरसर, शिवूर आदी गावांतील जिल्हा परिषट शाळांचा समावेश आहे.
चौक, कहरहाळा शाळेतील मुले हुशार आहेत
जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत असताना आणि शेकडो शाळांनी भोपळाही फोडलेला नसताना जि.प. शाळांमधील ५ वीचे ७७४ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका जि.प. शाळेचे सर्वाधिक ४१, केन्हाळा, शाळेचे ३९, सेलगाल ३८, सज्जनपूर ३७, जातेगाव ३३, चिकलठाण, कुंभेफळ यांचे ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. चौका व केहऱ्हाळा या जि.प. शाळेच्या मुलांनी गुणवत्ता सिद्ध करीत जिल्ह्यामध्ये बाजी मारली आहे.
१४१ शाळांचा १०० टक्के निकाल
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील ४६४ शाळांचा ५ वीच्या परीक्षेत शून्य टक्के निकाल लागलेला असताना जि.प.च्या १४१ शाळांतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १०० टक्के निकाल लागला आहे. वासडी, औरंगपूर, रेलगाव, धामणगाव तांडा, धोपटेश्वर, एकोड तांडा, खंडाळा, अंजनडोह आदी शाळांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे वाड्या वस्त्या, तांड्यांवरील शाळांतील सर्वाधिक विद्यार्थ्यांनीच गुणवत्ता सिद्ध केली आहे. सोयीच्या ठिकाणी शाळा असलेल्या अनेक शाळांचा शून्य टक्के निकाल लागलेला असताना वाड्या वस्त्या, तांडे व दुर्गम भागातील गावांतील शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन मुलांना हे यश मिळवून दिले आहे.
Comments are closed.