‘वेळेत दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती’, पुण्यात रुपाली चाकणकरांना घेरलं, त्याही संतापून म्

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Death Case) प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला देखील अटक झाली. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज (23 मे) पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक  झाली.वैष्णवी हगवणे प्रकरणी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला होता. दरम्यान आज(शुक्रवारी) रुपाली चाकणकर यांना छावा संघटनेचे धनंजय जाधव आणि महिलांनी जाब विचारला. लवकर ॲक्शन घेतली असती तर हे घडलं नसतं, असंही यावेळी धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे, यावेळी चाकणकर देखील काहीशा संतापल्याचं दिसून आलं. (Vaishnavi Hagawane Death Case)

नेमकं काय घडलं?

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कस्पटे कुटुंबांच्या भेटी वेळी जाब विचारला. मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा असे धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावलं. तुम्ही वेळेत दिवे लावले असते. तर आज ही वेळ आली नसती, असं म्हणत रूपाली चाकणकरांना घेरलं.

धनंजय जाधव म्हणाले, दोन मिनिटं तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगा ताई मागच्या प्रकरणांमध्ये देखील असं झालं. तुम्ही तुमच्या भूमिका संवेदनशील सांगा. आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारण्यासाठी आल्या आहेत, त्यावेळी रूपाली चाकणकर त्यांना शांत होण्याबद्दल सांगत होत्या, तुम्ही जर आधीच दिवे लावले असते तर आज ही वेळ आली नसती, असंही धनंजय जाधव यांनी रूपाली चाकणकर यांना म्हटलं. त्यावेळी रूपाली चाकणकरांनी हे अति होतं आहे म्हणत आम्ही सुमोटो दाखल केला आहे, एसपी ऑफीसला सर्व कागदपत्र दिली होती, कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, आम्ही न्याय देण्यासाठीच आहोत, असं चाकणकरांनी म्हटलं. या दारात उभे राहून न्याय मागावा लागतो, या पदावरती बसलेला आहात त्याची गरीमा संभाळा असं म्हणत धनंजय यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्या दोघांना आज अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कृर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

https://www.youtube.com/watch?v=CSOXDNSBG0C

अधिक पाहा..

Comments are closed.