चीनच्या दोन माजी संरक्षणमंत्र्यांना फाशीची शिक्षा; भ्रष्टाचारप्रकरणी धडक कारवाई
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चीनच्या दोन माजी संरक्षणमंत्र्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ली शांगफू आणि वेई फेंगहे या माजी संरक्षणमंत्र्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर लाचखोरी आणि पदाचा गैरवापर करण्याचे आरोप होते.
चीनच्या ‘शिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार फेंगहे आणि शांगफू यांची वर्ष 2024 मध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली होती. फेंगहे हे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. चीनच्या रॉकेट फोर्समध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार आढळला होता. क्षेपणास्त्रांमध्ये चक्क इंधनाऐवजी पाणी असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची चीनने गंभीर दखल घेतली होती. दोघांनाही दोन वर्षे तुरुंगात ठेवण्यात येईल. या कालावधीत त्यांनी इतर गुन्हा न केल्यास त्यांची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित होईल.
Comments are closed.