दागिने आणि पैशासाठी मानसिक छळ, चिपळूणच्या गांधारेश्वर पुलावरून विवाहितेने स्वतःला झोकून दिलं
चिपळूण क्राईम न्यूज : विवाहितेला सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी वारंवार मानसिक छळ करून आत्महत्येला (Crime News) प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या दोन महिलांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण शहरात हा धक्कादेणारा प्रकार घडला असून चिपळूण (Chiplun Crime News) खाडीमध्ये 23 सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या 40 वर्षीय अपेक्षा अमोल चव्हाण असे या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या आईने, सुनिता सखाराम गणवे (वय 65, रा. कांदीवली, मुंबईमूळ रा. शिवधामापूर, संगमेश्वर) यांनी दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात (Sangameshwar Police Station) तक्रार दाखल केली आहे.
Chiplun Crime News: सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी वारंवार मानसिक छळ
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीमध्ये एप्रिल 2025 ते दि. 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा छळ झाल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये 1) अमोल शंकर चव्हाण (वय 48 वर्षे, पती), 2) 67 वर्षीय एक महिला (सासू), आणि 3) दिवा येथील एक महिला (नणंद) यांचा समावेश आहे. हे तिघेही रा. शिवधामापूर, ता. संगमेश्वर. येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अपेक्षा चव्हाण यांनी तिच्या आईकडून कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने आणले होते. त्यापैकी काही दागिने पतीने गहाण ठेवले होते. ते दागिने सोडवण्यासाठी पतीने पैसेही दिले होते. मात्र, यातील तिन्ही आरोपींनी संगनमत करून दिलेले दागिने आणि पैसे परत मागू नयेत, तसेच व्यवसायाकरिता माहेरहून पैसे घेऊन यावेत यासाठी मयत अपेक्षा चव्हाण यांना वारंवार तगादा लावून त्यांचा मानसिक छळ केला.
Chiplun Crime : सततच्या त्रासाला कंटाळून अखेर टोकाचे पाऊल
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर अपेक्षा यांनी दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी चिपळूण खाडीमध्ये जाऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद दि. 16 ऑक्टोबर 202 रोजी करण्यात आली आहे.
धुळे क्राईम न्यूज : सरपंचसह त्यांच्या पत्नीचा तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न
धुळे तालुक्यातील अकलाड गावचे सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी धुळे तालुक्यात दाखल केलेल्या मागील गुन्ह्यातील आरोपी निलेश माधव सूर्यवंशी हा गावात मोकाटपणे फिरत असून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्याच्यावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील त्याला पोलिसांनी त्याला अद्यापपर्यंत जाणीवपूर्वक अटक केली नाही. त्याला तत्काळ अटक करा, या मागणी करिता सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
आपल्या गावाचे सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांचा मुलगा हर्षवर्धन सूर्यवंशी हा यांचे चुलत बंधू यांच्या घरासमोरून जात असताना शेती विक्रीच्या व्यवहारातून कुरापत काढून मला व माझ्या मुलाला बेदम मारहाण करीत आमच्या डोळ्यात मिरची पावडर देखील टाकली. तसेच लाकडी कुऱ्हाड्याच्या सहाय्याने माझ्या डोक्यात बेदम मारहाण केली. या भांडणावरून अजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस ठाण्यात सुरेश भदाने, कुणाल भदाणे, निलेश सूर्यवंशी व माधव सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून देखील हे सर्व आरोपी गावात मोकाट फिरत असून आमच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहे. तरी देखील पोलीस त्यांना अटक करत नाही म्हणून आम्ही तालुका पोलीस ठाण्यात मदनाचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.