त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरड


चित्रा वाघ: नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली. या प्रकरणावरून भाजप (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला. अशी घटना ऐकल्यावर काळीज पिळवटून निघते. सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला. गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली. नंतर मृत्यू झाल्याचं समजलं आणि होत्याच नव्हतं झालं. प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे की, गावातील 24 वर्षाचा तरुणाचं एक महिन्यापूर्वी तिच्या वडिलांसोबत भांडण झालं होतं. त्याने त्या निरागस बाळावर असूरी पद्धतीने राग काढला. तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला.

Chitra Wagh: समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ

पोलिसांनी तातडीने चौकशी करून अर्ध्या तासात विजय खैरनारला अटक केली आहे. अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही. आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. या प्रकरणात चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वोत्तपरी मदत करणार आहे. पीडित कुटुंबाला चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल.  त्या हराXXXला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हायला पाहिजे. त्याला शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. समाजात विकृत वावरणारे लांडगे ठेचायची आता वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

Nashik Crime: आरोपी विजय खैरनार पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संशयित आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे. चिमुरडीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी सुरु असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Crime: शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरात बळी…, नाशिकमध्ये भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करत तब्बल 50 लाखांना लुटलं

आणखी वाचा

Comments are closed.