मोठी खुशबखर! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, संजय शिरसाट यांनी दिले संकेत; इतरही जाचक अटी श

मुंबई : मुंबई तसेच उपनगरात आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं. त्यासाठी लोक जीवाचं रान करतात. म्हाडा तसेच सिडको यांच्यातर्फे मुंबई आणि उपनगरांत घरांची बंधणी करून त्यांची कमी किमतीत विक्री केली जाते. सामान्यांना परवडतील अशी घरे बांधून ती या दोन्ही संस्थातर्फे विकली जातात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. मात्र सिडकोची घरे फारच महाग आहेत, अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती. त्यावरच आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी आगामी काळात सिडकोची घरे स्वत होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

लवकर मोठे निर्णय होणार

संजय शिरसाट यांनी एबीपी माझाशी बातचित करताना अनेक मुद्द्यांवर मत मांडले. शिरसाट सध्या सिडकोचे अद्यक्ष आहेत. त्यामुळे सिडकोची महागडी घरे आणि त्याबाबत लोकांची तक्रार याविषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना त्यांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात येतील, असे संकेत दिले आहेत. तसेच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथील करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रहिवासी प्रमाणपत्राची अट काढून टाकण्याचे संकेत

सिडकोच्या घरांच्या विक्री प्रक्रियेतही बरेच महत्त्वाचे बदल करण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. एका कुंटूंबात याआधी सिडकोचे घर असले तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरे घर घेता यावे यासाठी अटीत बदल केले जातील, असे शिरसाट यांनी सांगितले. म्हणजेच हा बदल प्रत्यक्षात आला तर एकाच घरात सिडकोची एकापेक्षा अधिक घरे विकत घेता येतील. यासह सिडकोच्या घरांच्या घरेदीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची अटदेखील काढून टाकण्यावर विचार केला जाईल, असेही शिरसाट यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला सिडकोत घर घेता यावे, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.

लॉटरीच्या मुदतीत वाढ होणार

यासह सिडकोच्या लॅाटरीमध्येही मुदतवाढ देणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले. संजय शिरसाट यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरही भाष्य केलंय. देशमुख हत्याकांडाप्रकरणी सरकार गंभीर आहे. या प्रकरणातील दोषींना फाशी झाली पाहिजे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आढळला तर त्यांचा राजीनामा घेणे उचित आहे. फक्त कोणी मागणी केली म्हणून राजीनामा घेणे योग्य नाही, असे मतही संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

नोंदणी करण्याची मुदत संपली

दरम्यान, सिडको नवी मुंबई परिसरात एकूण 67 हजार घरं निर्माण करणार आहे. त्यातील 26 हजार घरांच्या विक्रीची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यासाठी माझ्या पसंतीचे सिडको घर योजना ही योजना राबवली जात आहे. सिडकोचे घर घेण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत 10 जानेवारी रोजी संपली आहे. आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा :

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरांसाठी प्राधान्यक्रम कसा नोंदवायचा? 15 घरांची निवड करावी लागणार, बुकिंग शुल्क कधी भरायचं?

Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर

अधिक पाहा..

Comments are closed.