‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनावरून दिल्लीमध्ये राजकीय वातावरण तापले; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात – TMarathiNews
नवी दिल्ली : सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्ककडे जात असताना अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला परवानगी नसल्याचे कारण पोलिसांनी दिले.
यापूर्वी पोलिसांनी दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आंदोलन न करण्याबाबत नोटीस दिली होती. कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने या आंदोलनाचे आयोजन केले होते. सायंकाळी पाच वाजता सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा रॅलीसाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र, आंदोलनापूर्वीच कनॉट प्लेस आणि परिसरात निर्बंध लागू करण्यात आले. या कारवाईवरून सीजेपीने भाजपवर टीका केली. अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी तणाव वाढल्याचे वृत्त आहे.
Comments are closed.