परळी जवळील शिरसाळा इथं दोन गट एकमेकांविरोधात भिडले; हाणामारी दरम्यान बुलेट पेटवली
बीड : बीडच्या (Beed) परळी (Parli) जवळील शिरसाळा येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक बुलेट गाडी देखील पेटवण्यात आली आहे. या प्रकरणात परस्परविरोधी शिरसाळा पोलीस ठाण्यात (Shirsala Policestation) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
परस्परविरोधी गुन्हे दाखल
परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेतील एका गटाने बुलेट पेटवली आहे. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपचे चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे, अशी धमकी दिली होती. यानंतर वाद घातल्यानंतर दोन गट आपापसात भिडले होते. यादरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली होती. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune : पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण; लोणी काळभोरच्या MIT कॉर्नरवरची घटना
अधिक पाहा..
Comments are closed.