बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही; संजय राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची प्रतिक्रिया
बुलढाणा : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे उद्या अनावरण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज या पुस्तकातील माहिती एबीपी माझाच्या हाती आली असून संजय राऊत यांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ईडीच्या कारवाईत संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी, 100 दिवस कारागृहात असलेल्या खासदार संजय राऊत यांनी तेथील अनुभवावर आधारीत ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. शिवसेना (Shivsena) आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेल्या मदतीची विस्तृत माहितीच संजय राऊत यांनी पुस्तकातून मांडली आहे. त्यामुळे, प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक वादग्रस्त व चर्चेत आहे. त्यावर, आता भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फड्नाविस) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकासंदर्भाने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, कथा कादंबऱ्या आणि बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यांच सोडून द्या, असेही फडणवीसांनी म्हटलं.
संजय राऊतांच्या ‘त्या’ पुस्तकाच नाव बद्दलण्याची गरज आहे. नरकातला राऊत असं पुस्तकाचं नाव ठेवावं, संजय राऊत यांना यासाठी पत्रही पाठवणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, या पुस्तकात स्वत:च राजकीय अधिपतन कसं असतं याचा लेखाजोखा मांडला, नैतिक दिवाळखोरीची कहाणी लिहिली आहे. भाजप सेना युती सर्वोत्तम होती, या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचा काम केले. संजय राऊत सारख्या व्यक्तीनेच शिवसेना संपवली, हिंदुत्व विचारांशी फारकत घेऊन काँग्रेसचा दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम केल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्या पुस्तकात काय?
दिल्लीत भाजपचे जेष्ठ नेते मला सांगायला आले होते, महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार आहोत. दिल्लीत आमचा निर्णय झाला आहे आणि मला शांत राहायला सांगितलं. नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल, असं मला सांगितलं. त्यानंतर मी हे सगळं व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवलं होतं, असे संजय राऊत यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
मोदींच्या अटकेला शरद पवारांचा विरोध
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचे सरकार होतं… मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता… गोधराकांडात सीबीआय अनेक चौकशींचा ससेमीरा लागला होता. या दरम्यान गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृह राज्यमंत्री अमित शाह यांना तुरुंगात जावे लागले होते. चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली. नरेंद्र मोदी यांना अटक होईल असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते. यावेळी त्यांची राजकीय मतभेद असतील पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असे परखड मत शरद पवारांनी एका कॅबिनेटमध्ये व्यक्त केले होते. शरद पवारांच्या या भूमिकेला अनेकांनी मूक संमती दिली होती आणि त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले ? असा सवाल या या पुस्तकात राऊत यांच्याकडून विचारण्यात आला आहे.
अमित शाहांसाठी शरद पवारांनी बाळासाहेबांकडे शब्द टाका
अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते, त्यानंतर तडीपारही केले. याप्रकरणी त्यांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता. त्या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते, त्यांचा तर शहांना जामीन देण्यास पराकोटीचा विरोध होता. या सगळ्यांमध्ये त्यावेळी मोदींनी पवारांना विनंती केली आणि पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली. शहा यांना एका प्रकरणात जामीन मिळाला. मात्र, मग अमित शाह पुढे महाराष्ट्राशी कसे वागले? असा प्रश्न या पुस्तकातून विचारण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी संकटकाळात फोन करायला पाहिजे होता
मी तुरुंगात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी एक तरी फोन करायला पाहिजे होता, असा संदर्भ तुम्ही दिलाय. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी संकटकाळात फोन करायला पाहिजे होता. त्याने एक आधार मिळतो. संकटाचा डोंगर आमच्या कुटूंबावर पडला होता.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.