आमदार संजय गायकवाड यांना देवाभाऊंची तंबी
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रत्येकाच्या मनात आदर आहे. विषय समजून न घेता चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावर अकांडतांडव करणे योग्य नाही, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत धमकावले. नेहमीच वादग्रस्त विधाने आणि भूमिका घेणाऱ्या गायकवाड यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले, चाळीस वर्षांनंतर अशा पद्धतीने एखादा वाद करणे कितपत योग्य आहे? याचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने शिवराळ भाषा वापरणे योग्य वाटत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायकवाड यांना योग्य समज देतील.
Comments are closed.