विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ठोस पावले उचला, युवासेनेची कुलगुरूंकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी युवासेनेच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ संलग्न अनेक बड्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी ड्रग्सच्या विळख्यात सापडले आहेत. नुकतीच गोरेगाव येथे आयोजित कॉन्सर्टमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थ सेवनामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ तसेच राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठ पुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी मुंबई विद्यापीठ, महाविद्यालये आणि महाराष्ट्र पोलीस खाते यांच्याद्वारे संयुक्त चळवळ उभी करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, महाविद्यालयांच्या जवळपास अमली पदार्थ विक्री होत आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे आदी मागण्या आम्ही विद्यापीठाच्या विविध फोरमवर केल्या होत्या. परंतु अपेक्षित कारवाई न झाल्याने गोरेगावसारखी घटना घडली आहे, याकडे सिनेट सदस्यांनी त्यांचे लक्ष वेधले. त्यावर चिंता व्यक्त करत विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन पुलसचिवांनी दिले.

Comments are closed.