शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इनस्टीट्युटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश, समिती


पुणे: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इनस्टीट्युटला (Vasantdada Sugar Institute) राज्य सरकारकडून देण्यात येणारे अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरण्यात येते आहे की नाही याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले आहेत. वसंतदादा शुगर इनस्टीट्युट (Vasantdada Sugar Institute) ही ऊस शेती आणि ऊस उत्पादनांवर संशोधन करणारी संस्था आहे‌. राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातुन प्रति टन एक रुपया या संस्थेला दिला जातो. त्याचबरोबर २००९ पासुन विविध स्वरुपाची अनुदाने देखील संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात. मात्र आता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम योग्य कारणासाठी वापरण्यात येते की नाही याची दोन महिण्यात चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना दिलेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर असे नेते आहेत.(Vasantdada Sugar Institute)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने या संदर्भात निर्णय घेतला असून, आयुक्त (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती अनुदानाचा मूळ उद्देशानुसार वापर झाला आहे का? याची सखोल तपासणी करून शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Vasantdada Sugar Institute: मंत्री समितीतील चर्चा

राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली. या बैठकीत व्हीएसआयला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. सध्या साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया या दराने निधी कपात करून तो व्हीएसआयकडे वर्ग केला जातो. मात्र, या निधीचा खरोखर संशोधन आणि विकासाच्या उद्देशानेच वापर केला जातो का, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे या निधीच्या वापराची चौकशी शासनाकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. बैठकीदरम्यान ऊस हंगामातील गाळप, शेतकऱ्यांना मिळणारे दर, तसेच कारखान्यांच्या कार्यप्रणालीसंबंधीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Vasantdada Sugar Institute: अहवाल शासनाला केला जाणार सादर

या चौकशी समितीने दोन महिण्यात चौकशी करून या कालावधीत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय घेणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर असे नेते आहेत. तसेच आता चौकशी लागल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.