‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनापूर्वीच कुटुंबीयांची झोप उडाली! अभिजीत दिपकेंच्या काकांना अश्रू
मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके(Abhijit Dipke) हे अमेरिकेतून भारतात दाखल झाले असून, त्यांच्या आगमनासोबतच संघटनेला हे पहिले मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, 6 जून (शनिवार) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतरमंतरवर (Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest) हे आंदोलन करता येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी स्वतः ट्विट (Tweet) करून समर्थकांना माहिती दिली. पोलिसांनी परवानगी दिली आहे. समर्थकांनी जंतरमंतरवर एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर एकीकडे दीपके यांनी घेतलेला हा निर्णय आणि त्यांची लोकप्रियता, तर दुसरीकडे त्यांच्या आई वडिलांना आणि काकांना त्यांची काळजी वाटू लागली आहे. आज दीपके यांचे लहान काका यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, त्यांना या सगळ्यांची, सरकारची भीती वाटते आहे, पुढे काय होईल काहीही सांगता येत नाहीये.(Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest)
Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest : सरकार काय करेल याचा आम्हाला अंदाज नाही…
एबीपी माझाशी बोलताना अभिजीत दीपकेचे काका विलास दीपके म्हणाले, अभिजीत अमेरिकेवरून आला ती चांगली गोष्ट आहे आणि आमच्यासाठी फार आज संकटाचा दिवस आहे. कारण रात्रीपासून आमची झोप उडाली आहे आणि जेवणाची इच्छा देखील गेली आहे, आम्ही फार चिंतेमध्ये आहोत. कारण हे सरकार काय करेल याचा आम्हाला अंदाज नाही. आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि आमचे दादा आणि वहिनी त्यांच्याशी देखील माझा संपर्क झालेला नाही. आम्ही फार चिंतेत आहोत, आजच्या घडीला काय होईल हे काय आम्हाला सांगता येणार नाही, त्यामुळे आम्ही खूप चिंतेत आहोत. लहान काका होण्याच्या नात्याने माझ्या मनात खूप काळजी वाटते. आम्हाला अन्न गोड वाटणं बंद झालं आहे आणि खाऊ पण वाटत नाही, असंही ते म्हणालेत.(Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest)
Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest : आमचा एकुलता एक मुलगा आहे
अभिजीत दीपके यांच्यासोबत आठ दिवस झालं बोलणं झालं नाही. खूप प्रयत्न करतोय पण बोललो नाही. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं अभिजीत दीपके आज दिल्लीमध्ये जंतर मंत्री येथे आंदोलन करणार आहेत. आमच्यासाठी फार आज संकटाचा दिवस आहे. कारण हे सरकार काय करेल याचा आम्हाला अंदाज नाही. आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि आमचे दादा आणि वहिनी त्याचा पण मला संपर्क नाही. आम्ही फार चिंतेत आहोत आणि काय होईल आजच्या घडीला हे काय मला सांगता येणार नाही, आम्ही खूप खूप चिंतेमध्ये आहोत, असं म्हणत अभिजीत दीपकेचे काका भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest : चार वाजेपर्यंत त्याचा काय मला फोन पण नाही…
अभिजीत दीपकेशी काही बोलणं झालं का? तुम्हाला दिल्लीला जायचं होतं का? यावर दीपकेचे काका म्हणाले, मी चार दिवस झालं ट्राय करतोय, काल मी चार वाजेपर्यंत त्याला रिक्वेस्ट केली, बाळा मला तुझ्याकडे यायचं आहे, तू मला मेसेज कर, पण त्यानी शेवटी मला नाकार दिला. माझी खूप इच्छा होती की, दिल्लीला जावं त्याच्या पाठीमागे उभं राहावं पण तसं काही झालं नाही. आता तो दिल्लीमध्ये आंदोलनाला जंतर मंतर येथे सुरुवात करणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई त्याच्यासोबत आहे, कॉकरोच जनता पार्टीचे ही चळवळ उभी केली, देशभरामध्ये आता तरुणाईचा त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय काका म्हणून तुम्हाला काय वाटतं? यावर अभिजीतचे काका म्हणाले, त्याच्या मागण्या योग्य आहेत, त्याने जे केले, तो ज्या मागण्या करत आहे त्या योग्य मागण्या आहेत, पण आता काय होईल ते सांगता येत नाही, तो काय वाईट काम करत नाही, तो देशासाठी नवीन पिढीसाठी अतिशय चांगलं काम करतोय, या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये त्याच्यासोबत सहभागी व्हायची माझी 100% इच्छा होती. मी चार पाच दिवस झालं त्याला रिक्वेस्ट करतो की बाळा मला यायचंय बाळा, मला यायचंय कॉल कर, काल चार वाजेपर्यंत मी त्याला रिक्वेस्ट केली, चार वाजेपर्यंत त्याचा काय मला फोन पण नाही आला आणि त्याने मला मेसेज पण केला नाही, असंही ते पुढे म्हणालेत.
तर त्याच्याशी काहीच नाही सर संपर्क झाला नाही, त्याच्यासोबत घरचा एकतरी सदस्य राहावा म्हणून मला जायचं होतं, असंही ते म्हणाले. मला खूप त्याची काळजी वाटते आणि आमच्या परिवारामधील तो हुशार आहे आणि एकच असल्यामुळे त्याची खूप चिंता वाटते, संविधानामध्ये जे आहे, त्यानुसार तो चाललेला आहे, आणि चालतोय त्याची ती खबरदारी पोलीस सरकारने घ्यावी आणि त्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं ही इच्छा आहे. त्याला अटक देखील होऊ शकते, कारण सरकार तस आहे, सरकारच्या मनामध्ये काय येईल ते काही सांगता येत नाही, अटक करतील किंवा नाही करतील ते त्यांचा सवाल आहे, पण आमच्या पोटामध्ये दुःख एकच आहे की त्याला 100% सरकार अटक करतील अशी आमची आम्हाला भीती वाटते पण असं होऊ नये. अभिजीतच्या आईवडिलांशी काहीही संपर्क झालेला नाही, दादाशी आठ दिवस झालं बोललो नाही झालं. खूप प्रयत्न करतोय पण बोललं नाही झालं असंही अभिजीत दिपकेच्या काकांनी सांगितलं आहे.
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.