वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…; पुण्यातील महिलेचा अजितदादांना सल्ला
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे (Ajit Pawar) मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली, रस्त्यांची अवस्था,मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी बाबत नागरिकांनी अजितदादांसमोर गाऱ्हाण मांडलं. यावेळी मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा असा सल्ला एका महिलेने अजित पवारांना दिला. वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल असं म्हणत महिलेने थेट अजित पवारांना आव्हान दिलं. (Ajit Pawar)
अमनोरा रोड संदर्भात महिलेने तक्रार केल्यानंतर अजित पवारांनी देखील महिलेला सुनावलं आहे. मला मान्य आहे, माझ्याकडून चूक झाली, मात्र मला तुम्हाला सांगायचं आहे की, मी काम करायला आलो आहे. मला काम करू द्या. अजित पवारांचे महिला नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर उत्तर दिलं आहे.
अजित पवार अन् महिलेमध्ये काय झाला संवाद?
अजित पवार – तुम्ही यायच्या आधी आम्ही सगळ्या समस्या ऐकल्या आहेत. त्यांनी निवेदन दिलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या एजन्सी आल्या आहेत. पीएमसी आहे, पीएमआरडीए, आत्ताच नागरिकांना त्याचा देणंघेणं नाहीये, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे आहेत, त्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहे. त्या संदर्भामध्ये आमचं काम सुरू आहे.आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही त्या कामांमध्ये अधिक कशी गती देता येईल या कामांना प्रायोरिटी कशी देता येईल हे पाहतो.
महिला- आम्हाला खूप आशा आहेत. जसे पर्रीकर दिवसा फिरायचे ट्राफिक बघण्यासाठी तसेच तुम्ही कधीतरी ट्राफिकचा टाईम असतो, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असं नाही की माहिती होऊ शकत नाही.
अजित पवार – (पर्रिकरांच नाव घेतल्यावर) पर्रिकर कोण?
महिला- गोव्याचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर ते जसे फिरायचे दिवसा ट्राफिक बघण्यासाठी तसे तुम्ही कधीतरी फिरून बघा आणि न सांगता व्हिजिट करत चला. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार असं नको व्हायला.
अजित पवार – आम्ही प्रश्न विचारायला आलेलो नाही. मी स्वतः इथला परिसर ठीक व्हावा. सगळ्या समस्या सोडवल्या जाव्या यासाठी प्रयत्न करतोय.
महिला – असं नाही सर, इथल्या समस्या बघता इथे राहायचं की नाही हा प्रश्न पडलाय आम्हाला.
पुण्यातील मुंढवा चौकात अजित पवार यांच्याकडून पाहणी
पुण्यातील मुंढवा चौकात अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंढवा केशवनगर या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. अजित पवार वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुंढवा चौकात पोहोचले. सिग्नल यंत्रणा व्यवस्थित करा अशी सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंढवा केशवनगर परिसरातील चौकांची आणि रस्त्यांची अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून अजित पवारांनी वाहतूक कोंडीची समस्या समजून घेतली.
ट्रॅफिकमुळे संतापलेल्या स्थानिक महिलेचा मनोहर पर्रिकरांचं नाव घेत थेट अजित पवारांना सल्ला दिला.#Ajitpawar #प्यूनिन्यू #ट्रॅफिकअपडेट pic.twitter.com/xrgtoH9kjj
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 14 सप्टेंबर, 2025
आणखी वाचा
Comments are closed.