दसऱ्यापूर्वी महागाईचा भडका; निळा एलपीजी सिलेंडर महागला; जाणून घ्या नवे दर
एलपीजी किंमत भाडे: दसऱ्याच्या आधी महागाईने थैमान घातले आहे. ऐन सणासुदीच्या काळात, १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price Hike) किमतीत १६ रुपयांची वाढ केली आहे, जी आजपासून लागू झाली आहे. दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १,५९५.५० रुपये असेल, जी पूर्वी १,५८० रुपये होती. सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशभरातील बहुतेक शहरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ₹८५० ते ₹९६० दरम्यान आहे. सध्या, घरगुती एलपीजी सिलिंडर (LPG Price Hike) दिल्लीमध्ये ८५३ रुपयांना, मुंबईत ८५२.५० रुपयांना, लखनौमध्ये ८९०.५० रुपयांना, अहमदाबादमध्ये ८६० रुपयांना, हैदराबादमध्ये ९०५ रुपयांना, वाराणसीमध्ये ९१६.५० रुपयांना आणि पटनामध्ये ९५१ रुपयांना उपलब्ध आहे.(LPG Price Hike)
LPG Price Hike: १९ किलोच्या सिलिंडरचे नवीन दर
तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर, दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता १,५९५.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १,५८० रुपये होती. कोलकातामध्ये, हे सिलिंडर आता १,७०० रुपये किमतीत उपलब्ध होईल, जे पूर्वी १,६८४ रुपये होते. मुंबईत ते १,५४७ मध्ये उपलब्ध असेल. पूर्वी त्याची किंमत १,५३१.५० होती. चेन्नईमध्ये आता सिलिंडरची किंमत १,७५४ आहे, जी सप्टेंबरमध्ये ₹१,७३८ होती. दरामध्ये १६ रूपयांनी वाढ झाली आहे.
LPG Gas: घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. मात्र व्यावसायिक सिलिंडरसह विमान इंधन म्हणजे ATF च्या किमतीत बदल करण्यात आला आहे आणि दिल्लीत आता प्रति किलोलिटर 813.44 रुपये झाला आहे.
Rule Change 1st October: ऑक्टोबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार!
रेल्वे तिकीट बुकिंग, डिजिटल पेमेंट, ऑनलाइन गेमिंग आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टमचा नियमांमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ते नियम कोणते? एक एक करून जाऊन घेऊयात…
Rule Change 1st October: रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल
आतापर्यंत, एजंट आणि दलाल IRCTC तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक होते. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. पण आता १ ऑक्टोबरपासून, IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरूवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळेल.
Rule Change 1st October: पेन्शन योजनेत बदल
नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) मध्ये एक नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू केले जाईल. यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल.
Rule Change 1st October: डिजिटल पेमेंटमध्ये बदल
आता सर्वच जण UPI (Google Pay, PhonePe, Paytm) वापरून डिजिटल पेमेंट करतात. आता, NPCI ने एक मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबरपासून NPCI ने UPI चे “रिक्वेस्ट फॉर मनी” फीचर बंद करण्याचा निर्णय घेतलाय… या फीचरचा वापर कोणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो. याचा अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी गैरवापर केला जात असे. आता ते बंद झाल्यामुळे, डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील. गुगल पे आणि फोनपे सारख्या अॅप्सद्वारे पैसे मागण्यासाठी ही सुविधा आता उपलब्ध राहणार नाही.
ऑनलाईन गेमिंगमध्ये बदल
ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे. परंतु त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. सरकारने मंजूर केलेले नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाईल. खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रणाली मिळेल. फसवणूक आणि बनावट अॅप्सवर बंदी घातली जाईल. यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.
आणखी वाचा
Comments are closed.