Commonwealth Games मधील भारताच्या 564 पदकांची गोष्ट! दोन वेळा खेळाडूंना परतावे लागले रिकाम्या हाताने
राष्ट्रकुल खेळ 2026 (Commonwealth Games) स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये होणार आहे. यामध्ये भारताला 125 खेळाडूंसकडून सर्वाधिक पदकांची आशा आहे. या खेळाची सुरूवात 1930 मध्ये झाली. यामध्ये भारताने आपला सहभाग दुसऱ्या आवृत्तीत म्हणजे 1934 मध्ये नोंदवला होता.
एका पदकाने सुरू झाला भारताचा हा प्रवास, 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या शेवटच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 564 पदकांपर्यंत पोहोचला आहे. असे असले तरी दोन आवृत्त्यांमध्ये भारताला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
पहिल्या तीन आवृत्त्यामध्ये केवळ एकच पदक
ग्लासगोमध्ये या स्पर्धेची 23 वी आवृत्ती होत आहे. भारताने आतापर्यंत केवळ 18 स्पर्धांमध्येच भाग घेतला आहे. त्यातील दोन स्पर्धेत भारताला एकही पदक जिंकता आलेले नाही. 1938 च्या सिडनी आणि 1954 च्या व्हॅंकुव्हर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपदक जिंकण्यात अपयश आले होते. यावरून भारताने या स्पर्धेच्या पहिल्या तीन स्पर्धांमध्ये केवळ एकच पदक जिंकले होते.
भारताने ते पदक 1934 च्या लंडनमधील जिंकलेले कांस्य पदक होते. राशिद अन्वर यांनी 74 किलौ फ्रीस्टाईल गटात कुस्तीमध्ये हे पदक जिंकले होते. त्या स्पर्धेत केवळ सहा खेळाडूंनी भाग घेतला होता.
पहिले गोल्ड मेडल जिंकण्यास लागला 24 वर्षांचा काळ
भारतासाठी 1958 वर्ष ऐतिहासिक ठरले. मिल्खा सिंग यांनी 440 यार्डची शर्यत जिंकून इतिहास रचला. ते राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ठरले. कार्डिफमध्ये झालेल्या या स्पर्धेत कुस्तीपटू लीला रामनेही सुवर्णपदकाची कमाई केली.
यावरून 1958 मध्ये भारताने दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदके जिंकली. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी होताना दिसली.
1966 चा हंगाम किंग्सटन येथे झाले, जिथे भारताने पहिल्यांदा पदकांचा दुहेरी आकडा गाठला. 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारताने एकूण 10 पदके जिंकली. 1970 च्या एडिनबर्गमध्ये भारताने 5 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई केली.
1974 आणि 1978 या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने प्रत्येकी 15-15 पदके जिंकली. 1982 च्या ब्रिस्बेन स्पर्धेत भारताने 16 पदके जिंकली.
1990 च्या स्पर्धेत पदकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
1990 चे वर्ष भारतासाठी अधिक यशस्वी ठरले. तेव्हा भारताने तब्बल 32 पदके जिंकली होती. यावरून मागील हंगामाच्या तुलनेत भारताच्या पदाकांमध्ये दुप्पटीने वाढ झाली होती. 1994 आणि 1998 मध्ये पदकांची संख्या कमी झाली. तेव्हा भारताने अनुक्रमे 24 आणि 25 पदके जिंकली होती, मात्र यानंतर जे घडले त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
भारताची सर्वोत्तम कामगिरी अणि दिल्ली 2010 स्पर्धेत थेट शंभरी
भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी 2002 मध्ये झाली. मॅंचेस्टरमध्ये झालेल्या त्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 30 सुवर्ण पदकांसह 69 पदके जिंकली. नंतरच्या आवृत्तीत मात्र पुन्हा पदकांची संख्या घसरली. 2006 च्या मेलबर्नमध्ये भारताने 50 पदके जिंकली.
भारताने 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली क्षमता दाखवली. तेव्हा भारताने 38 सुवर्ण पदकांसह तब्बल 101 पदके जिंकली. ही भारताची या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने इतकी सुवर्णपदके जिंकली नाहीत आणि पदकांची संख्याही अधिक नव्हती.
भारताने 2014 ला ग्लासगोमध्ये 64 पदके, 2018 गोल्ड कोस्टमध्ये 66 पदके (26 सुवर्ण) आणि 2022 मध्ये 22 सुवर्ण पदकांसह 61 पदके जिंकली.
564 पदके
भारताने 1934 मध्ये जिंकलेल्या पहिल्या पदकापासून ते 2022 पर्यंत, एकूण 564 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके आहेत. भारताने 203 सुवर्ण, 190 रौप्य आणि 171 कांस्य पदक जिंकले आहेत. (Commonwealth Games India performance won first and only medal in 1934 now had 564)
Comments are closed.