काँग्रेस नेत्याच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना आव्हान.
तेलंगणातील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला
हैदराबाद: तेलंगणा काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद आता उघडपणे समोर आला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्याच्या कन्येने त्यांच्यावर जाहीरपणे शाब्दिक हल्ला चढविला आहे. राज्यातील मंत्री कोंडा सुरेखा यांची कन्या कोंडा सुष्मिताने मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे आव्हान दिले आहे. पारकलमध्ये बोलताना सुष्मिता यांनी वर्तमान आमदार रेवूरी प्रकाश रेड्डी यांच्यासाठी रेवंत रे•ाr यांच्या समर्थनाला आव्हान दिले. तसेच रेवंत रे•ाr यांच्या अधिकारावरही प्रश्न उपस्थित केले. सुष्मिता यांचा मुख्यमंत्री रेड्डी यांच्याविषयीचा संताप केवळ उमेदवारीवरून नव्हता. वर्तमान आमदाराला मुख्यमंत्र्यांकडून जाहीर समर्थन दर्शविण्यात आले होते. यावर सुष्मिता यांनी ‘दोन वर्षांची प्रतीक्षा करू नकप, आमदाराला आताच राजीनामा द्यायला सांगा आणि निवडणूक लढवू द्या’ असे आव्हान सुष्मिता यांनी दिले आहे. पारकलच्या प्रतिनिधित्वाच्या प्रकरणी मुख्यमंत्री रेड्डीयेवोत, त्यांचे पिता येवोत किंवा आजोबा येवोत, पारकलची आमदार मीच होणार असे वक्तव्य सुष्मिता यांनी केले आहे. काँग्रेसने मला उमेदवारी न दिल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास तयार आहे. माझी उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार रेवंत रेड्डी यांना नाही. अहंकारी रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात तेलंगणा काँग्रेस टीडी काँग्रेस ठरला आहे. पक्षाचे मूळचे नेते पक्षाच्या दिशेबद्दल नाराज असल्याचा दावा सुष्मिता यांनी केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांच्या भावाने 200 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केला आहे. रेवंत रेड्डी यांच्या परिवाराशी निगडित अन्य घोटाळ्यांचाही मी पर्दाफाश करू शकते, असा इशारा सुष्मिता यांनी दिला आहे.
Comments are closed.