मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ


सातारा : राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (Election) आज प्रचाराचा अंतिम दिवस असून मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील काही नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाची आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका पढे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावरुन, राजकीय मत-मतांतर व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण) यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला निवडणूक आयोगाने गोंधळ घातला, याला सरकार जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मोठा दावा केला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी (Prime Minister) मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता आहे, असे चव्हाण यांनी म्हटले.

एपस्टाईन फाईल्सवरुन अमेरिकेत गेल्या 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ आहे, ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून

अमेरिकेत मोठा उद्योगपती. जेफ्री अ‍ॅमस्टिन त्याचं नाव आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.अमेरिकेची संसद त्यांच्या मागे लागली आहे. नावं खुलं करण्यास सांगत आहे. पण ट्रम्प करत नाहीत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून असून 10 हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रं उघड करू शकते. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडीओ केला आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच, आज त्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. त्यामुळे, मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

निवडणुका पुढे ढककल्या, मुख्यमंत्रीच जबाबदार

राज्यातील काही नगरापलिका क्षेत्रात निवडणुका पुढे ढकलल्या, त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. राज्यात गेली पाच वर्ष नोकरशाहीचे राज्य असून अचानक 20 नगरपालिका पुढे ढकलल्या जातात, त्याला सरकारच जबाबदार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. निवडणूक आयोग हा भाजपचा असल्याने कितीही आंदोलने केली आणि जरी राहुल गांधी यांनी कितीही डोके फोडले तरी यात काहीही होऊ शकत नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड मध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

हेही वाचा

अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश; राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.