राहुल गांधींच्या विश्वासू मोहऱ्याची पत्नी, निधनानंतर काँग्रेसने विधानपरिषदेवर पाठवलं पण आता त्य

Pradnya Satav entry into the BJP: काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने भाजपला काँग्रेसने मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे, हिंगोलीच्या राजकारणात एकेकाळी मोठं नाव असलेले माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांना कोविडने हिरावून नेलं आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली. प्रज्ञा सातव्या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. याबाबत मोठ्या हालचाली भाजपकडून होताना दिसत आहेत. राजीव सातव यांच्या कामाचा सन्मान म्हणून पक्षाने प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधानपरिषदेवर काँग्रेसने संधी दिली. परंतु अपेक्षित नेतृत्व, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांशी नाळ या तिन्ही बाबतीत त्यांना भक्कम पकड मिळवता आली नाही. त्यानंतर आता त्याच काँग्रेसचा हात सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Who is Pradnya Satav:  कोण आहेत सातव?

डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत.  काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.

राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.

राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भुषविली होती.

प्रज्ञा सातव: प्रज्ञाताई तसं पाऊल उचलतील असं वाटत नाही: आमदार सतेज पाटील

प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिली आहे. प्रज्ञाताई तसं पाऊल उचलतील असं वाटत नाही. ही बातमी निराधार आहेत असं मला वाटतं. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. त्या असं कोणतंही पाऊल उचलतील असं मला वैयक्तिक वाटत नाही, आता अधिवेशनावेळी देखील आमची बऱ्याचदा चर्चा झालेली आहे, त्या असं पाऊल उचलणार नाहीत असं काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.